केला रे केला सुरसुंडीच्या ग्रामपंचायतने केला भोंगळ कारभार केला

गडचिरोली :–धानोरा तालुक्यातील अति दुर्गम भागातील डोंगराच्या पायथ्याशी रस्त्यावर बसलेले सुरसुंडी गांवच्या ग्रामपंचायत चा भोगळ कारभार सुरु आहे . गावातील नाल्या सफाई पावसाळ्या पूर्वी झाल्याच नाही .

त्यामुळे नाल्या माती व केरकचर्‍याने तुडुब भरून आहेत . त्यामुळे गावातील वातावरण दुर्गधी युक्त झालाचे पहावयास मिळतो . सदर ग्राम पंचायत चा ग्रामसेवक वाकडी गावावरून ७० कि मी अंतरावर आठवळ्यातुन एकदाच जातो . त्यामुळे गावातील लोकांची कामे होत नाहीत . सदर ग्रामपंचायत चे ग्रामसेवकाकडे १५ व्या वित आयोगाचे अनेक कामे आहेत निधीही मंजूर आहे . नाल्या सफाई व बांधकाम शाळेची दुरस्ती स्वच्छता भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालय बांधकाम जि . प . शाळा दुरस्ती इत्यादी कामे करावयाची आहेत . परंतु गावकऱ्यांना याची कल्पनाच नाही . सार्वजनिक शौचालय तयार झाले तर हागणदारी मुक्त गावं होइल शाळेची पड़की इमारत दुरस्त होइल तर विद्यार्थाना त्रास होणार नाही .परंतु सदर ग्रामसेवकांनी हि कोणतीच कामे न करता कागदोपत्री दाखवणार तर नाही ना अशी चर्चा गावात सुरु होती .

या ग्रामसेवकाकडे सुरसुंडी व ईरुपटोला दोन ग्रामपंचायतीचा कारभार आहे . कामे पण सारखीच आहेत परतु सदर कामाची पुसटसी कल्पनाही बिडिओ व संबधित अभियंतांना नाही . याच ग्राम पंचायत च्या ग्रामसेवकांनी यापूर्वी अशीच बोगस कामे केली होती त्यामुळे ग्रामस्थानी तक्रार केल्यामुळे त्यांचेवर वसुली सुरु आहे . या ग्रामसेवकांवर बिडिओ व अभियंताचा वरदहस्त तर नाही ना . असे बोलल्या जात आहे परस्पर हि सर्व कामे कागदोपत्री झाली की काय अश्या शंका कुशंकेला वाव मिळत आहे संवर्ग विकास अधिकार्यांनी याकडे लक्ष घ्यावे व अश्या भ्रष्टाचारी व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post