विठ्ठलराव बनपुरकर महाविद्यालयात दोन दिवसीय खोखो पुरुष स्पर्धेचं समारोप


एजाज पठाण प्रतिनिधि 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत एडवोकेट विठ्ठलराव बनपुरकर महाविद्यालय मालेवाडा येथे, दिनांक ४ व ५ नवंबर 2022 पर्यंत आंतर महाविद्यालय खो-खो पुरुष स्पर्धा, आयोजित करण्यात आली होती, त्या खो - खो स्पर्धेत प्रथम क्रमांक आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी व तिसरा क्रमांक आदर्श महाविद्यालय देसाईगंज (वडसा) यांना मिळाला. समारोपीय तथा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एच. एम. कामडी, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक जीभकाटे प्राचार्य साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा, प्रमुख अतिथी डॉक्टर उदारामजी टेकाम, मा.वसंतची घरते, मा. प्रकाशजी बनपूरकर आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप नंदेश्वर तर सूत्रसंचालन प्रा. कुमारी हेमा कराळे हिने केले व आभार डॉ. प्रकाश वैद्य यांनी मानले, सदर कार्यक्रमाचे यशस्वीते करिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. सदर दोन दिवशीय स्पर्धेत, रिपोर्टिंग व रजिस्ट्रेशन चे कार्य प्रा.हिवराज राऊत यांनी कार्य पाहिले.


Post a Comment

Previous Post Next Post