भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट* पं. स. सदस्य घनशाम धामट

          सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, संधीची समानता, कोणतीही जात व धर्म यांच्याशी पक्षपात न करता सर्वांना समान संधी देणारा, सर्वोत्कृष्ट देशाचा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान, ह्या संविधानाचे सर्वांनी वाचन करून आत्मसात करावे असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशोरी संविधान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
      याप्रसंगी उमरपायली येथील मुख्याध्यापक तेजराम गेडाम यांनी केंद्रातील सर्व शाळांना आपल्याकडून संविधान पुस्तिका भेट म्हणून दिली.
       सर्वप्रथम संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राचे पूजन करून हार करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम धामट पंचायत समिती सदस्य हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कैलास शेंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती केशोरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख पी. आर. खोब्रागडे, मुख्याध्यापक पी. एन. जगझापे, राजेश साखरे मुख्याध्यापक, तेजराम गेडाम मुख्याध्यापक, गजानन रामटेके मुख्याध्यापक, युवराज बोरकर मुख्याध्यापक, लक्ष्मण कोल्हटकर, डी एम कोल्हे, पवन कोहळे, गीता बडोले उपस्थित होते.
          मुख्याध्यापक पी एन जगझापे यांनी प्रास्ताविक करताना संविधानाबद्दल विशेष माहिती सांगितली. भारतीय संविधानात 395 कलमे व बारा परिशिष्टे असून हे संविधान दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसात पूर्ण होऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत करण्यात आले असे सांगितले.
      केंद्रप्रमुख पी आर खोब्रागडे यांनी संविधानाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक कैलास शेंडे यांनी भारतीय जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
      याप्रसंगी उमरपायली येथील मुख्याध्यापक तेजराम गेडाम यांनी आपल्याकडून केंद्रातील सर्व शाळांना संविधान पुस्तकेचे निशुल्क वितरण केले. त्याबद्दल केंद्रातील सर्व शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.
        कार्यक्रमाचे संचालन गुंफेश बिसेन यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत पवनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंश काडगाये, हर्षद कापगते, जीविका शहारे, जीविका बोरकर, भावना नंदेश्वर, नलू मरसकोल्हे यांनी सहकार्य केले. सरते शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post