पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होत पत्नीचा लफडा सुरु, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह...


गुजरातच्या सूरत शहरात अलिकडे गुन्ह्यांची संख्या बरीच वाढली आहे. काही दिवसांआधीच एका तरूणाने ओडिशातून आपल्या प्रेयसीला आणून सूरतमध्ये तिची हत्या केली होती. आता सूरतच्या डिंडोली भागातही एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. या कृत्यात तिच्यासोबत तिचा प्रियकर आणि आणखी एक तरूण होता.

शहरातील डिंडोली भागातील पार्क ओवर ब्रिजच्या खाली पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. आधी तर मृतदेह कुणाचा आहे हे पोलिसांना समजलं नाही. पण पोलिसांनी जसजसा पुढे तपास केला त्यांनी केस सॉल्व केली.

पोलिसांचा तपास सुरूच होता तेव्हा एक महिला डिंडोली पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या महिलेला पती बेपत्ता झाल्याबाबत काही प्रश्न विचारले. पण ती काहीच उत्तर देऊ शकली नाही. पोलिसांनी जेव्हा तिला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तिने कबूल केलं की, पोलिसांना जो मृतदेह सापडला होता तो तिचा पती विनोद बालदेव याचाच आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी पूनमने हे कबूल केलं की, पतीसोबत तिचं नेहमीच भांडण होत राहत होतं. गेल्या 17 डिसेंबरच्या रात्रीही तिचं पतीसोबत भांडण झालं होतं. याचं कारण हे होतं की, पतीचा मित्र सागर कोळीसहीत राहुल कोळीसोबत पूनमचे अनैतिक संबंध होते. पूनमने राहुल आणि सागरसोबत मिळून पती विनोदचा गळा आवळून हत्या केली होती आणि मृतदेह ब्रिजच्या खाली रेल्वे रूळावर फेकला होता.

डिंडोली भागात रेल्वे रूळावर दोन दिवसांआधीच सापडलेल्या मृतदेहाबाबत खुलासा झाला तर सगळेच हैराण झाले. पत्नी पूनमने पतीची हत्या दोन्ही प्रियकरांसोबत मिळून घरातच केली होती. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली.

डीसीपी भगीरथ गढवी यांनी सांगितलं की, पत्नी पूनमने पतीचा मृतदेह रेल्वे रूळावर फेकला, जेणेकरून त्याचा मृत्यू अपघाताने झाला असं दिसावं आणि पोलिसांना फसवण्यासाठी तिने हे केलं. याबाबत चौकशी केली जात आहे. रात्री 2 वाजता एक रेल्वे गेल्यावर मृतदेह रूळावर टाकण्यात आला होता. त्यानंतर जी रेल्वे आली तिचा स्पीड कमी होता. रेल्वे चालकाला रूळावर मृतदेह दिसला हता. त्याने रेल्वे थांबवून पोलिसांना सूचना दिली.

महिलेचे पतीच्या दोन मित्रासोबत अनैतिक संबंध होते. घरात दारूची पार्टी झाली. ज्यात पती आणि त्याचे मित्रही होते. यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ केली. याचा राग तिच्या प्रियकराला आला आणि त्याने ओढणीने महिलेच्या पतीचा गळा आवळला. नंतर मृतदेह ऑटोमध्ये टाकून रेल्वे रूळाजवळ गेले आणि मृतदेह खाली फेकला. जेणेकरून असं वाटावं की, रेल्वेमुळे त्याचा जीव गेला.

मृतदेह ऑटोमध्ये टाकताना तीन लोक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. मृतदेह सापडल्यावर पोलिसांना हे लक्षात आलं होतं की, मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे. पण मृतकाची काहीच ओळख पटत नसल्याने केस सॉल्व करणं पोलिसांसाठी आव्हान होतं. अखेर पोलीस मृतकाच्या पत्नीपर्यंत पोहोचले आणि त्यांना तिच्यावर संशय आला होता. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post