आईच्या तेरवी ऐवजी शाळेला दिली १ लाख रुपयाची देणगी


भंडारा: भंडाऱ्यात रूढी परंपरेला फाटा देत एका कुटुंबाने समाजासमोर नवा आदर्श मांडल्याचे समोर आले असुन आईच्या तेरवी ऐवजी शाळेला १ लाख रुपयाची देणगी देत त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.तरुणाच्या या कामगिरीचे मोठे कौतुक होत असुन आईची स्मृती कायम राहावी यासाठी शाळेला देणगी देणाऱ्या या तरुणाचा उल्लेख आता आधुनिक काळातील श्रावणबाळ असा होऊ लागला आहे.

शाळेला १ लाख रुपयांचे दान देणाऱ्या या तरुणाचे नाव आहे गुरुदेव शेंडे.गुरुदेव हा मोहाडी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोहाडीपासुन १० किमी अंतरावर असलेल्या धोप गावातील रहिवासी आहे.त्याची आई यशोदा हिरालाल शेंडे( वय ६७ वर्षे) यांचे २४ जुलै रोजी निधन झाले.त्यानंतर समाजाच्या नियमावलीनुसार मृत्यूनंतर तेराव्या दिवशी गावातील लोकांना भोजन देण्याची रूढी,परंपरा असते.पण त्या रूढी,परंपरेला मात देत त्यांच्या मनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली.

शाळेला डिजिटल करण्याचा केला विचार
सामाजिक परंपरेला फाटा देत गुरुदेव याने आपल्या आईची तेरवी करण्याऐवजी गावातील जिल्हा परिषद शाळेला डिजिटल बनवण्याचा विचार केला.यावर त्यांनी आपल्या दोन भावांचे मत विचारले.त्यानंतर सर्वचे एकमत घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा बांधण्यासाठी १ लाख रुपयाची अनुदान रक्कम भेट दिली आहे.

आता या पैशाने शाळेला संगणक,प्रोजेक्टर आदी वस्तु घेऊन डिजिटल केले जाणार आहे.गुरुदेव शेंडे या तरुनाने अशा प्रकारे आपल्या आईचे ऋण फेडले असुन त्याच्या आईचे नाव आता सतत स्मरणात राहणार आहे.आज लोक तेरवीसारख्या कार्यक्रमात भरमसाठ पैसा खर्च करत असतात.मात्र तेच पैसे असे सार्थिकी लावले तर त्याचे नक्कीच चीज होणार यात मात्र शंकाच नाही.

Post a Comment

Previous Post Next Post