भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांचे नेतृत्व प्रकल्पग्रस्त करणार



विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत अथवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नोंदणीकृत - अनोंदणीकृत स्थानिक भूमिपुत्र ठेकेदारांच्या न्याय-हक्कासाठी लढणाऱ्या नवी मुंबई काँट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी परप्रांतीय अश्या रेनिल जेकब या लखपती कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामुळे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व हे आता प्रकल्पग्रस्तांचे स्थानिक नेते करण्यात अपयशी ठरले असून, स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदारही असक्षम असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटदारांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्या अस्तित्व व हक्कांच्या रक्षणार्थ नवी मुंबई काँट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या संघटनेच्या श्री. रेनील जेकब अध्यक्ष,श्री. जितेंद्र रौंदळे सचिव,श्री. राजेश साळी उपाध्यक्ष ,श्री. जयवंत पवार खजिनदार ,श्री. आनंद वैश्य सदस्य,श्री‌. महेश ठाकूर सदस्य कोअर कमिटीचे सौ वैजयंती दशरथ भगत- माजी नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिका,श्री. अमित मढवी ,सौ‌‌. निलिमा मढवी ,श्री. किशोर पाटील ,श्री. जितेश म्हात्रे ,श्री. प्रशांत भोईर ,श्री. मनीष पाटील ,श्री. गौरव म्हात्रे ,श्री. वासुदेव पाटील,श्री. रमेश पाटील ,श्री. आर. पी. भगत ,श्री. जगदीश पाटील ,श्री. संकेत पाटील ,श्री. मनोज भगत यांची सदस्य पदावर आणि अस्थानिय कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. ही बाब कुठेतरी स्थानिक भूमीपुत्रांचा अवमान झाला असल्याची भावना निर्माण करणारी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post