अन् त्याने तहसीलदारांच्या कानाखाली आवाज काढला


नाशिक:- जमिनीचे भांडणे हे कोणाचे ही होत असतात. नावावर लावण्यावरून किव्हा नावे कमी करण्यावरून...किव्हा भावांमध्ये जमीन वाटपावरून हे भांडणे होत असतात.पण इथे जरा वेगळा प्रकार घडला आहे.तो म्हणजे एक संतप्त व्यक्तीने चक्क नायब तहसीलदार यांच्या कानशिलात मारल्याची घटना घडली आहे. सातबारा उताऱ्यावर माझे नाव का नाही आहे .इतरांचे कसे आहे ह्या कारणावरून नाशिकधील सुरगाणा येथील तहसील कार्यालयात असलेल्या नायब तहसीलदार यांच्या कानशिलात चापट मारली आहे.

संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायब तहसिलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील हट्टी येथील भारत गुलाब पवार ही व्यक्ती अन्य दोन जणांसोबत तहसिल कार्यालयात मंगळवारी दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास आली होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निवडणूकशाखेत बसून शासकीय कामकाज करीत असताना यावेळी भारत गुलाब पवार याने सोबत आणलेला हट्टी गाव शिवारातील गट नंबर ५० चा उतार दाखविला. या उताऱ्यावर माझे नाव का कमी केले. तसेच उताऱ्यात इतर लोकांची नावे कशी आली. अशी विचारणा केली. उताऱ्यावर तुमचे नाव आहे व तुमच्या वडिलांच्या पाच्यात तुमचे नाव लावावे लागेल त्यासाठी तुम्हाला तसा अर्ज करावा लागेल ,असे यावेळी नायब तहसीलदार यांनी त्या व्यक्तीला सांगितले.यावेळी संबधीत भारत नावाच्या व्यक्तीला राग येऊन त्या व्यक्तीने मोरे याना शिवीगाळ करत त्यांना एक कानशिलात मारली व त्याची कॉलर पकडली व शर्टची बटणे देखील तोडले.तुम्हाला सर्वांना बघून घेऊन अशी धमकी देखील दिली.असे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरगाणा पोलीस करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post