गर्भवती महिलेने घेतली विहिरीत उडी, आणि तिथेच झाली प्रसूती

चंद्रपूर/भद्रावती: नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने विहिरीत उडी घेतली.विहिरीत तिने बाळाला जन्म दिला. पाण्यात बुडाल्याने दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सूमठाणा येथे घडली.


पोलिसांनी नवजात बाळ आणि बाळाच्या आईला बाहेर काढले.निकिता ठेंगणे (27) असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे निकिता हिचा पहिला मुलगा एक वर्षातच मरण पावला तर आठ महिन्याच्या मुलीचा पाळण्यातच मृत्यू झाला होता.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, जिल्ह्यातील सूमठाणा येथील निकिता ठेंगणे या गर्भवती महिलेने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतल्या नंतर पाण्यात प्राणांतिक वेदनेने ती तडफडत असतानाचं पाण्यातच तिची प्रसूती झाली.तिने मुलीला जन्म दिला होता.मात्र पाण्यात बुडाल्याने महिलेचा व नवजात बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शनिवारच्या रात्री उशिरापर्यंत विहिरीतून महिलेचे शव काढण्यात आले.

मात्र नवजात बालक विहिरीच्या तडाला गेले असल्याने आज पहाटेला नवजात बालकाचे शव बाहेर काढण्यात आले. निकिता हिला पहिला मुलगा झाला होता. मात्र एक वर्षाचा तो झाला असताना त्याचा मृत्यू झाला. दुसरी मुलगी झाली. ती आठ महिन्याची असताना तिचा पाडण्यातच मृत्यू झाला होता.या दोन्ही घटनांमुळे निकिता खचली होती.
निकिता मानसिक अस्वस्थ असल्याने कदाचित तिने असे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दरम्यान पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post