८ जानेवारी रोजी मानाच्या 'पालखी'चे जुईनगर ते कार्ला पाई पालखी सोहळ्याचे आयोजन


विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : 'नवी मुबंई'ची मानाची पालखी अशी ख्याती प्राप्त झालेल्या एकविरा आई देवी पदयात्रा पालखीचे प्रस्थान येत्या ८ जानेवारी २०२२ रोजी नवी मुंबईतील जुईनगर येथून होणार आहे.

जुईनगर येथील 'गावदेवी युवा मित्र मंडळ'चे संस्थापक-अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे या वर्षीही जुईनगर ते श्री क्षेत्र आई एकविरा देवी मंदिर, कार्ला डोंगर असा पालखी पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यात नवी मुंबईतील शेकडो शेकडो तरुण मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सहभागी होतात. तर हजारो नागरिक पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या पालखीला खांदा देण्यासाठी नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, समाजसेवज आवर्जून हजर राहतात. येत्या ८ जानेवारी रोजी जुईनगर मधील गावदेवी मंदिरात सकाळी ८ वाजता आरती करुन पालखी एकविरा गडाकडे प्रस्थान करणार असून, ११ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी कार्ला गडी पोहोचणार आहे. या पालखी सोहळ्यात नवी मुंबईतील अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'गावदेवी युवा मित्र मंडळ'चे संस्थापक-अध्यक्ष शैलेश भोईर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post