३० वर्षीय पत्नीचं बाहेर प्रेमप्रकरण आल अन्

नाशिक : पत्नी आणि तिच्या प्रियकाराच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी असे आत्महत्या केलेल्या ३४ वर्षीय पतीचे नाव आहे.

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची तीस वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात राकेश उर्फ राधेश्याम टिकमदास वैष्णव बैरागी यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता गंगापूर पोलिसांना बापू पूल परिसरात एक अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याचं समजलं. बोटिंगला आलेल्या अंबादास तांबे यांनी हा मृतदेह बघितला होता. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती.


Post a Comment

Previous Post Next Post