खड्डेवर खड्डे रस्ता खड्डेमय तरीही नूतनीकरण होईना ! रस्ता दुरुस्ती करा. मनसेच्या सारंग सपाटेच्या मागणीला यश

खड्डेवर खड्डे रस्ता खड्डेमय तरीही नूतनीकरण होईना !
रस्ता दुरुस्ती करा. मनसेच्या सारंग सपाटेच्या मागणीला यश


 आरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी मनसेचे पळसगाव शाखा प्रमुख, सारंग सपाटे यांनी लावून धरली .त्यांच्या मागणी ला यश आले.रोडच्या दुरुस्ती चे कामे सुरु झाली.

 जोगीसाखरा -पळसगाव मार्ग अनेक गावांना जोडतो. आदी गावांतील ग्रामस्थ या मार्गाने आरमोरी तालुका मुख्यालयात व आरमोरी बाजारात ये-जा करतात.

खासगी वाहनांसह व अन्य वाहनांची वर्दळ दररोज असते. या मार्गावर जागोजागी खड्डे पडून अत्यंत दुरवस्था झाली होती. खड्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने या मार्गाची केवळ डागडुजी न करता नूतनीकरण करावे, अशी मागणी पळसगाव परिसरातील विशेष म्हणजे, सदर मार्गाची दुरूस्ती करण्याची वारंवार मागणी करण्यात आली होती. परंतु दुर्लक्ष झाले.रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाले. पळसगाव मनसे शाखा प्रमुख सारंग सपाटे .

Post a Comment

Previous Post Next Post