दारूचा धंदा सोडा अन् एक लाख मिळवा...

दारूचा धंदा सोडल्यास मिळणार एक लाख

पाटणा, बिहारमध्ये दारू बंदी कायद्याच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी बिहार मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला असून दारूविक्री सोडल्यास गरीब कुटुंबांना सरकारकडून एक लाखाचे आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. ताडीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही योजना लागू असणार आहे. दारू आणि ताडीचा व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबांच्या पूनर्वसनासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या योजनेला मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातींमधील कुटुंबियांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. एप्रिल २०१६ मध्ये बिहारमध्ये दारू बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी आता शहरी भागातही होणार असून ही योजना सर्व वर्ग आणि समाजांसाठी लागू असेल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव एस. सिद्धार्थ यांनी दिली आहे. ही योजना पूर्वी केवळ गावांपुरती मर्यादीत होती.

Post a Comment

Previous Post Next Post