गुटखा आणि तंबाखूच्या प्रेमप्रकरणात दोघांना अटक, एक फरार

गोंदिया : अवैध धंद्यांच्या उच्चाटनासाठी गोंदिया जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नंगपुरा मुर्री येथील गुदामातून ११ लाख ७७ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला. तसेच वाहतूक करताना ९ लाख ५९ हजार रुपयांचा गुटखा, तंबाखू व मालवाहतूक ट्रक असा एकूण २७ लाख ३६ हजार २४७ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 

व्हिडियो
👇👇👇👇👇




ही कारवाई ८ डिसेंबर रोजी करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक तर एक फरार झाला आहे. राजेश बुधराम राजगडे (२६) रा. सिव्हिल लाईन, मासून चंदू आसवानी (२३) रा. सिंधी कॉलनी या दोघांना अटक करण्यात आली. तर मोहित नारायणदास आसवानी (३०) रा. मुर्री गोंदिया हा फरार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post