वैरागड आणि सावली तालुक्यात हिऱ्यांच्या खाणी ? भूगर्भ वैज्ञानिकांनी संशोधन केल्याचा दावा

तिवाडे यांच्या याच जागेवर खुंटी गाडून मोजणी केली होती.

सावली : भूगर्भ वैज्ञानिकांनी १९९७-९८ या कालावधीत सावली तालुक्यातील घोडेवाही व पाथरी येथे संशोधन करून या गावातील भूगर्भात हिन्यांचा साठा असल्याचे सांगितले होते. त्यादरम्यान घोडेवाही येथील ज्ञानेश्वर तिवाडे यांच्या घरातील चुलीमध्ये खुंटी गाडून या ठिकाणी केंद्रस्थान असून यापासून चारही दिशेला सुमारे पाच किमीच्या परिसरात हिन्यांचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले होते, असे आजही घोडेवाही येथील ग्रामस्थ सांगतात.

व्हिडियो 



इंग्रजांच्या राजवटीत संपूर्ण भारतभर भूगर्भातील संशोधन करून मौल्यवान धातूंचा साठा कुठे आहे, या नोंदी करून ठेवल्या आहेत, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले. घोडेवाही येथील संशोधनाला साधारणतः २५ वर्षांचा कालखंड लोटला आहे. मात्र या संदर्भात अजूनही कोणतीच हालचाल झालेली नाही. ज्ञानेश्वर तिवाडे यांच्या घरातील चुलीवर खुंटी गाडून तेथूनच - चेतन रामटेके, उपसरपंच घोडेवाही. भूगर्भातील संशोधनाला सुरुवात केली. संशोधनाअंती भूवैज्ञानिकांच्या चमूने हिन्यांचे साठे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरणनिर्माण झाले होते. मात्र या संशोधनाला आता सुमारे २५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र संशोधन व सर्वेक्षणानंतर ही कार्यवाही पुढे सरकली नाही.

व्हिडियो 





म्हणे गडचिरोली जिल्ह्यातही आहे हिऱ्यांचा साठा ?

गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथेही अशाच प्रकारे हियांचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे तेथील संशोधनाच्या पुढील कार्याची गती वाढलेली आहे. एवढेच नव्हे तर एका विदेशी कंपनीकडून हिन्याचे उत्खनन करण्यासाठी करार केल्याचेही गावकयांच्या ऐकिवात आहे. विशेष म्हणजे, वैनगंगेच्या खोऱ्यात अनेक मौल्यवान धातूंचा साठा उपलब्ध आहे. हे आतापर्यंतच्या अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवरच या दोन्ही गावांत संशोधन करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post