गाईवर केला १६ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार


पुणे:- वर्तमानपत्र उघडले किंवा टीव्ही चॅनल सुरू केले की देशातील कुठल्यातरी भागात महिला , तरुणी आणि चिमुरड्या मुलांवर अत्याचाराच्या बातम्या वाचण्यात येतात. त्यावेळी जीव कासावीस होतो. पण आता जी बातमी समोर येत आहे ते वाचून युवा पिढी कुठल्या स्तराला जात आहे. हा विचार मनुष्याची विचारसारणी कुंद करीत आहे.

इंटरनेट च्या जमान्यात सगके काही हेका क्लिक वर मिळत असल्याने मुलं वेळेआधीच वयात येत आहेत.ज्या वयात शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे त्या वयात मुलं मर्डर, बलात्कार अश्या मार्गाला लागल्याचे दिसून येत आहे. आता हेच बघा ना ! हडपसर परिसरात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मोकळ्या जागेत बांधले असलेल्या गाईवर तिचे पाय बांधून अनैसर्गिक कृत्य केल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हे पुण्यातील फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात राहतात. १३ डिसेंबरला घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती.सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा त्याठिकाणी आला. त्याने गायीचे हातपाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला.

दरम्यान, हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात येताच, त्यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित मुलाविरोधात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर भादवी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं आहे. गौमता म्हणून मानत असलेल्या गाईवर १६ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post