*क्रांतिबा सार्वजनिक वाचनालयातुन तयार होणाऱ्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत घडवावा -जयदीप खोब्रागडे


चिरोली:- वाचनालय निर्मिती करण्याचा उद्देश मुलांना नौकरी मिळावी, आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळावं एवढाच हेतु नसावा तर कायदा व नियमाचे पालन करीत भारत भ्रष्टाचार मुक्त घडवावा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांनी केले
ते चिरोली येथील क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय च्या वेबसाईट विमोचन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते



यावेळी युवारत्न हंसराज कुंभारे यांच्या हस्ते क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय च्या वेबसाईट चे विमोचन करण्यात आले
पुढे बोलताना जयदीप खोब्रागडे म्हणाले ज्या महामानवानी पुस्तकासाठी घर बांधले स्वतःची मुल पैश्याअभावी उपचाराअभावी मरण पावली मात्र त्याच दुःख जेवढं बाबासाहेबाना होत नव्हतं त्याच्या पेक्षा जास्त दुःख एखाद पुस्तकं त्यांना मिळालं नाही तेव्हा होत होत
यावेळी विचार पिठावर जयदीप खोब्रागडे,हंसराज कुंभारे, कृष्णाक पेरकावर, प्रकाश तावाडे, कोमल बोरकर, मीनल बुक्कावार, वर्षा लोनबले, रेखा बुरांडे, मंजुळा रामटेके, सीमा मेश्राम, प्रशांत रामटेके, यशवंत महाडोळे, तानाजी कुंभारे यांची उपस्थिती होती
पुढे बोलताना जयदीप खोब्रागडे म्हणाले, गावागावात नको तर प्रत्येक घराघरात वाचनालय तयार व्हायला पाहिजे आम्ही जर बाबासाहेबांचे अनुयायी असणार तर याची सुरुवात स्वतःच्या घरापासून व्हायला हवे
वाचनालयाची निर्मिती करीत असताना आमचे ध्येय काय आहेत हे विचारात घ्यायला पाहिजे निव्वळ पोटाची खळगी भरणे उपजीविका करणे हे उद्देश नसायला पाहिजे



ज्या दिवशी नौकरी लागली त्या दिवसापासून पुस्तकाशी त्याच काहीच देणंघेणं नाही तरीही आम्ही म्हणत आहोत बाबासाहेबांचे अनुयायी
  यावेळी कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावना वाचनाने झाली
प्रस्तावना चे वाचन सारिका गदेकार यांनी केले
                पुढे बोलताना ते म्हणाले, नौकरी किंवा पोट भरण्याचे साधन मिळालं पाहिजे ही आपली गरज आहे आणि ती नक्कीच मिळाली पाहिजे मात्र हे करीत असताना वाचन हे फक्त माझ्या नौकरी पुरतं मर्यादित नसावं जगातल अंतिम सत्य काय आहे आणि त्या सत्यापर्यंत पोहचत वाचन केल पाहिजे असेही ते म्हणाले
             यावेळी महात्मा फुले विद्यालयातील सेवानिवृत्त कर्त्यव्य दक्ष लिपिक तानाजी कुंभारे यांचा सत्कार करण्यात आला
पुढे बोलताना ते म्हणाले सगळीच पुस्तके चांगली असतात असं नाही चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजण्यासाठी सदविवेक असायला पाहिजे सदविवेक बुद्धिमुळे च जग जिंकता असे ते म्हणाले
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष अलोणे, सूत्रसंचालन पुजा निकुरे तर आभारप्रदर्शन सुनिल सोनुले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा पुण्यप्रेडडीवर, पुजा निकुरे, सारिका गदेकार, चंदा मंडरे, नरेश वाघाडे, सुभाष निकुरे, अनिल गदेकार, राजेंद्र शिंदे, सुनिल सोनुले, लीलाधर गुरनुले, संतोष अलोणे यांनी सहकार्य केले

Post a Comment

Previous Post Next Post