गुजरात-हिमाचल निवडणूक…गुजरातमध्ये भाजप पुढे तर हिमाचल मध्ये काट्याची टक्कर…


गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून 2017 च्या तुलनेत यावेळी दोन्ही टप्प्यात कमी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 60.20 टक्के लोकांनी मतदान केले होते, तर 5 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात 64.39 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.


आम आदमी पक्षाच्या जोरदार प्रवेशाने काँग्रेससह भाजपलाही अडचणीत आणले होते. त्यामुळेच भाजपलाही शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून 10 हून अधिक केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि विविध राज्यांच्या 50 हून अधिक मंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या.


एकट्या पंतप्रधानांनी 39 रॅलींद्वारे गुजरातमधील 134 विधानसभा जागा कव्हर केल्या. त्याचवेळी भाजपचे चाणक्य म्हटल्या जाणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले.

हिमाचल प्रदेशमध्ये, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढत दिसून येते. भाजप-काँग्रेसमध्ये बरोबरीची लढत होत आहे. भाजपला 33 तर काँग्रेसलाही 33 जागा मिळाल्या. इतरांचे खाते उघडले नाही.


Post a Comment

Previous Post Next Post