आढळला रे आढळला..वैरागड - मानापूर रस्त्यावर आढळला पट्टेदार वाघ

वैरागड:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड - मानापूर रोडवर आज सकाळी 7.20 वाजता वाघ आढळून आला अशी माहिती मिळालेली आहे.


सविस्तर वृत्त असे आहे की आकाश विद्यालय मोहझरी येथील शिक्षक सकाळची शाळा असल्यामुळे श्री पारधी सर हे शाळेत कारने जात असताना तसेच त्यांच्याच मागे गजबे सरांची कार होती त्यांना अचानक S मोडिच्या समोर बोडने सराच्या शेताच्या जवळ  पट्टेदार वाघ आढळुन आला. तो वाघ मेंढेबोडी जंगलाकडून वडेगाव जंगलाकडे गेल्याचे सरांना दिसला. पारधी सर कारने समोर निघाले आणि गजबे सर आपली कार थांबाऊन फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण फोटो स्पष्ट निघाली नाही.

या वरुन परीसरात वाघाचे अस्तित्व आहे असे लक्षात येत आहे. त्यामुळे वैरागड मानापुर रस्त्यावर प्रवास करत असताना नागरिकांनी उचित काळजी घेऊन प्रवास करावा. या परिसरात वाघ आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे . विशेष म्हणजे या भागात वाघ आढळुन आला पण अजून पर्यंत कुठल्याही माणसावर वाघाने या परिसरात हल्ला न केल्यामुळे वाघ सध्या या परिसरात वावरताना दिसून येत आहे . त्यामुळे वनविभागाने या वाघाकडे लक्ष ठेवून या वाघा विषयी जनजागृती करावी असे नागरिकांनी वनविभागाला कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post