विष प्राशन करणाऱ्या 'त्या’ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू


नापिकीतून आले कर्जबाजारीपण


 कोरची :- नापिकीमुळे वाट्याला आलेल्या कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन अस्थिर सोनकुकरा (६० वर्ष) या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. १२ डिसेंबरलाच त्यांनी कीटकनाशक घेतले होते. पण गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना गुरुवारी (दि. १६) त्यांचा मृत्यू झाला.

मागील २-३ वर्षांपासून तालुक्यात  कोरडा दुष्काळ पडला. यावर्षी ओल्या दुष्काळाने ग्रासले. त्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न घेता आले नाही. त्यामुळे कर्ज फेडता येईल एवढे धान्य झाले नाही.

सोनकुकरा यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे दीड लाखांचे कर्ज आहे तसेच महिंद्रा फायनान्सकडून त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला होता. नापिकीमुळे हप्ते भरणे शक्य झाले नाही. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत सोनकुकरा यांनी ही टोकाची भूमिका घेतली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद कोरची पोलिस ठाण्यात करण्यातआली


Post a Comment

Previous Post Next Post