प्रेम सिध्द करण्यासाठी प्रियसीला प्रायव्हेट पार्टवर त्याचं नाव लिहण्यासाठी सांगितल अन् पुढं उलटचं घडलं


प्रेमात व्यक्ती काय काय करतील याचं काहीच सांगता येत नाही. पण काही वेडे लोक असेही असतात जे प्रेमाची सीमा पार करतात. हे लोक प्रेयसीला असा काही त्रास देतात की, वाचून हैराण व्हायला होतं.नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकराने आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी ब्लेडने आपलं नाव लिहायला लावलं, तेही प्रेयसीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर.

इतकंच नाही तर त्याने याचा व्हिडीओही व्हायरल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलीसांच्यानुसार, अवेंद्र सोनवानी नावाच्या तरूणाने त्याच्यासोबत नर्सिंग शिकत असलेल्या 21 वर्षीय प्रेयसीला तिच्या हातावर आणि छातीवर ब्लेडने त्याचं नाव लिहिण्यासाठी भाग पाडलं. या घटनेचा त्याने व्हिडीओही बनवला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली

पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरोधात रेप, विनयभंग आणि धमकी देण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की, आरोपीने काही दिवसांआधी तरूणीला फोन केला आणि तो तिला म्हणाला की, जर ती त्याच्यावर प्रेम करत असेल तर तिने तिच्या हातावर आणि छातीवर ब्लेडने त्यांचं नाव लिहावं. तरूणीने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मग हात आणि छातीवर ब्लेडने त्याचं नाव लिहिलं.

यानंतर आरोपीने या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. असं सांगितलं जात आहे की, आरोपीने तरूणीच्या वडिलांनाही हा व्हिडीओ पाठवला होता. ज्यात तरूणी छाती आणि हातावर ब्लेडने त्याचं नाव लिहित आहे. यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणाविरोधात तक्रार दाखल केली.


Post a Comment

Previous Post Next Post