बापने केली दोन मुलाची हत्या


उत्तरप्रदेश - राज्यातील पिलीभीत मध्ये वडीलाने 2 मुलांची हत्या करीत आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे, विशेष म्हणजे या हत्येमागील कारण सुद्धा डोकं चक्रावणारे आहे.

पिलीभीत मध्ये बालकराम नावाच्या व्यक्तीचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे, बालकराम यांना 11 वर्षीय मुलगा व 15 वर्षीय असून त्याने 2 मुलांचा गळा आवळून खून करीत स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.
धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार दुसऱ्या खोलीत असलेल्या 14 वर्षीय मुलाने बघितला.
मुलाने याबाबत कुटुंबांना माहिती दिली, पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
बालकराम यांच्या खिश्यात 4 पानी सुसाईड नोट मिळाली, त्यामध्ये हा सर्व प्रकार आत्मा ने केला असून माझा बदला पूर्ण झाला असे त्यामध्ये नमूद होते.
पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता सदर सुसाईड नोट हे कुणीतरी अन्य व्यक्तीने लिहले असल्याचा अंदाज लावला आहे.
पोलिसांनी आता सर्व बाजूने तपास करायला सुरुवात केली असून सदर प्रकार अंधविश्वास मधून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. India crime news
मात्र बालकराम च्या या कृत्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे, पुढील तपास पिलीभीत पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post