परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली च्या वतीने दि.२८/१२/२०२२ ला मौजा रामगड तालुका कुरखेडा येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन पार पडले.


दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी
सुपर फास्ट बातमी 7822082216
गडचिरोली


 कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे सकाळी ७.३० वाजता सामुहिक हवन कार्य पार पडले.त्यानंतर मानवधर्माची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.१२ वाजता अल्पोपहार देण्यात आला . ठीक १२.३० वाजता एका भगवंताचे चर्चासत्र पार पडले .चर्चासत्राचे अध्यक्ष श्री डॉ गोविंदराव दोनाडकर साहेब अध्यक्ष नियोजन समिती सेवाभावी संस्था गडचिरोली हे होते.उद्घाटन श्री हिंमतलालजी किरमे अध्यक्ष परमात्मा एक सेवक मंडळ लांजी यांनी भूषविले. प्रमूख पाहुणे म्हणून अशोकराव ठुब्रिकर अध्यक्ष लोककल्याण समिती नागपूर, जयेंद्रजी उपराडे कार्यकर्ता बालाघाट, दिवाकराजी ठेंगरे अध्यक्ष सेवाभावी संस्था गडचिरोली,फाल्गुनजी मानकर ज्येष्ठ मार्गदर्शक कुरखेडा, संतोष चोरनोले अध्यक्ष केंद्रीय समिती लांजि, गिरिषजी पारधी सचिव केंद्रीय समिती, भजनराव पदा उपाध्यक्ष केंद्रीय समिती लांजी , विठ्ठलजी राऊत तसेच व्यासपीठावर मार्गदर्शक , ज्येष्ठ सेवक उपास्थित होते. चर्चासत्रात अंधश्रद्धा, वाईट व्यसन, हुंडाबळी,कुटुंबनियोजन यावर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. सेवक संमेलन निमित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सेवक संमेलनाला परिसरातील सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                चर्चासत्राचे संचालन श्री. माणिकजी मेश्राम,प्रास्ताविक श्री प्रशांत ठेंगरे सर तर आभारप्रदर्शन श्री गुणवंतजी फटे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post