मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या वतीने सावली तालुक्यात बालपंचायत मेळावा (चर्चासत्र) संपन्न



(सावली) दिनांक :- 26 ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सावली तालुक्यातील व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, पाथरी, साखरी व निफंद्रा, इत्यादी गावांमध्ये मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन, चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात SCALE उपक्रमा अंतर्गत बालपंचायत मेळाव्याचे (चर्चासत्र) आयोजन करण्यात आले. चर्चासत्रा करिता सावली तालुक्यातील एकूण 26 शाळेतील शालेय मंत्रीमंडळाने म्हणजेच बालपंचायतीने सहभाग घेतला. खालील महत्वाच्या विषयावर शालेय मंत्र्यांनी आपली मते मांडली...
१. शाळेत मुला - मुलींसाठी स्वच्छत: गृहाची सोय असावी. 
२. किचन शेडची शाळेला नितांत गरज. 
३. खेळाचे मैदान व्यवस्थीत नाही, मैदानात खड्डे आहे त्या वर उपाय योजना. 
४. शाळेत पिण्याच्या पाण्याची योग्य सोय. इत्यादी विषय चर्चा सत्रात रंगले..
सदर कार्यशाळा आणि चर्चासत्रात शालेय मंत्रिमंडळ म्हणजेच बालपंचायतीचे महत्व, जबाबदाऱ्या, कर्तव्य, व त्यांचे अधिकार या वर सर्व मंत्रीमंडळाला मॅजिक बस संस्थेचे तालुका समन्वयक आकाश गेडाम, शाळा सहाय्यक अधिकारी श्रद्धा नागमोते, मंगेश रामटेके, निशा उमरगुंडावार यांनी मार्गर्शन केले. 
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या छोट्या छोट्या समस्या ओडखने आणि त्यावर उपाय योजना करणे, बालपंचायतीच्या सभेत प्रस्ताव मांडणे, सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करणे, जटिल समस्या व मोठ्या निर्णयांसाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य घेणे. बालपंचायत सभेचे अहवाल लेखन करने इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन मॅजिक बस संस्थेच्या वतीने करण्यात आले. 

त्या सोबतच बालपंचायतीची मासिक सभा कशा प्रकारे आयोजित केली जाते? याच प्रत्याक्षिक जिल्हा परिषद उच्च प्राथिक शाळा निफंद्रा, पेंढरीमक्ता, डोनाळा, साखरी आणि केरोडा येथील शालेय मंत्रीमंडळाने सादर केले. उपस्थीत सर्व शालेय मंत्री मंडळातील मंत्र्यांना त्यांच्या पदाची बॅचेस प्रदान करण्यात आली व चर्चासत्राची समाप्ती झाली.
संपुर्ण चर्चासत्र हे शाळा सहायक अधिकारी श्रद्धा नागमोते, मंगेश रामटेके, निशा उमरगुंडावार व सर्व गावातील समुदाय समन्वयक यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या पार पडले.

हर्षद कऱ्हाडे

Post a Comment

Previous Post Next Post