ट्राफिक पोलिसांनी तुमची गाडी पकडली तर काय करावे

 *गाडीची चावी काढणं दूरच, ट्रॅफीक पोलीस पावतीही फाडू शकत नाहीत; तुम्हालाही आहेत हे अधिकार*

👮🏻‍♂️ बऱ्याचदा ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेतात, लायसन्स जप्त केलं जातं. गाडीवर बसलेले असतानाही गाडी उचलली गेल्याची घटना तुम्ही पाहिली असेल. अशा परिस्थितीत आपले अधिकार काय आहेत? ट्रॅफिक पोलिसांना कोणत्या मर्यादा असतात? जर तुमच्यासोबत चुकीची गोष्ट घडली तर कुठे तक्रार करायची? अशा गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

📑 वाहन चालवताना तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असावी? जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबवले तर ते ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगू शकतात. त्यामुळे सर्व कागदपत्रे तुमच्या कारमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता 📲 Digi Locker या मोबाईल अ‍ॅपमध्येही तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड करुन दाखवू शकता.

⁉️ *ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यावर तुमचे अधिकार काय आहेत?*

🪪 *आयडेंटीटी:* तुम्हाला थांबवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाची ओळख विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही त्यांचा बकल नंबर किंवा नाव लिहून ठेवू शकता आणि बकल नसल्यास त्यांना त्यांचे ओळखपत्र विचारू शकता. जर ट्रॅफिक पोलीस कर्मचारी त्यांची ओळख लपवत असल्यास तुम्ही त्यांना तुमची कागदपत्रे सादर करण्यास नकार देऊ शकता.

🚗 *ड्रायव्हिंग लायसन्स* : मोटार वाहन कायद्याच्या कलम 130 नुसार जेव्हा पोलीस अधिकारी तुम्हाला कागदपत्रे विचारतील तेव्हा तुम्ही फक्त ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे आवश्यक आहे. उर्वरित कागदपत्रे सोपवण्याचा पर्याय पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.

👉🏻 *ड्रायव्हिंग लायसन्सच्या जप्तीविरुद्ध पावती :* जर पोलीस अधिकाऱ्याने तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केलं तर तुम्हाला तुमच्या परवान्याविरुद्ध ट्रॅफिक पोलिस विभागाने जारी केलेली वैध पावती दिली असल्याची खात्री करा.

👉🏻 *कारमध्ये कोणी बसले असल्यास टो करू शकत नाही :* जर कोणी कारमध्ये बसले असेल तर वाहतूक पोलीस तुमची कार टो करू शकत नाहीत. जोपर्यंत कोणीतरी गाडीच्या आत बसले आहे तोपर्यंत तो टो करता येत नाही.

👉🏻 *पोलिसांच्या अरेरावी विरोधात तक्रार नोंदवा:* जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला योग्य वागणूक दिली गेली नाही किंवा ट्रॅफिक पोलिसांकडून तुमचा छळ होत असेल तर तुम्ही या घटनेची तक्रार ऑनलाइन किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करू शकता.

👉🏻 *चलन बुक किंवा ई-चलान जनरेटर:* ट्रॅफिक पोलीस केवळ सरकारकडून जारी केलेले चालान बुक किंवा ई-चलान मशीन असतानाच चलन जारी करू शकतात. घटनास्थळी असलेला पोलीस अधिकारी उपनिरीक्षक किंवा त्याहून अधिक दर्जाचा असेल तर तुम्ही घटनास्थळीच चलन भरू शकता.

👉🏻 *तुम्हाला जबरदस्तीने वाहनातून उतरवू शकत नाही:* भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत कोणताही पोलीस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाही किंवा तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही. एवढेच नाही तर ते तुमच्या कारच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत.


Post a Comment

Previous Post Next Post