कुरखेडा तालुक्यातील पळसगावच्या जंगलात हत्तीचे आगमन...

कुरखेडा :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील पळसगाव कोशी या जंगलामध्ये हत्तीचे रात्री आगमन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 हे हत्ती पळसगावच्या जंगलामध्ये असल्याची वन विभागाला माहिती होताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

पळसगाव येथील नागरिकांना हत्तीची माहिती भेटताच त्या हत्तींना जंगलामध्ये हाकलविण्याचा वन विभागाच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन वन विभागाने परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post