जिथं गेलं तिथं आरमोरी नगरपरिषद चा भोंगळ कारभार .*



प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या लवकर सोडवा अन्यथा आंदोलन करण्यात-विभाताई बोबाटे


आरमोरी :- आरमोरी नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक ३ येथील मधील जाधव यांच्या घरापासून ते भुरसे यांच्या घरापर्यंत चा मार्ग खोडून ठेवल्याने वाहतूक ठप्प झाली आहे व सदर काम बंद असल्याने वार्डातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे व भुरा यांच्या घरापासून ते गडचिरोली रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम कासवगतीने सुरू असल्याने सदर ठिकाणी यश मडावी नावाच्या मुलाचा अपघात झाला व त्याला किरकोळ जखम झाली आहे त्यामुळे वार्डातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सदर नालीचे बांधकाम व जाधव यांच्या घरापासून भुरसे यांच्या घरापर्यंत चा रस्त्याचे काम जलद गतीने करण्यात यावे व सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून नाली बांधकाम करण्यात यावे व कोसरे यांच्या घरासमोरील पुलियाची उंची व रुंदीकरणं करण्यात यावे तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या नळाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्षा मा.विभाताई बोबाटे यांनी केली आहे अन्यथा नगरपरिषद समोर आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post