*_महापरिनिर्वाण दिनी भीम स्वरांजली कार्यक्रम* *_



गडचिरोली. पंचशील बुध्द विहार रामनगर गडचिरोली येथे दिनाक ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्रौ ७ वाजता बुध्द भीम गीतांचा स्वरांजली पर कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सिद्धार्थ गोवर्धन यांनी वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. निता उराडे यांनी संविधान गीत सादर केले.नंदा खोब्रागडे यांनी भिमा घे पुन्हा या गीताने आनंद निर्माण केला. तर गोंडणे मॅडम यांनी दिल्लीच्या तख्तावरुनी बोले भीम अश्या अर्थपूर्ण आणि तालबद्ध गाण्यांनी सर्वांनी प्रफुल्लित केले, अविनाश चिल्लमवार यांनी तुझ्या रक्तातला भीम लढू दे रनी या वीर रसात गायन करून स्पूर्ती आणली. तर वनिता बांबोले यांनी अशी कमाल केली दादा तर जनसागर रडला होता अश्या भावपूर्ण आशयाच्या गीताने आदरांजली वाहण्यात आली.
       

कार्यक्रमात हार्मोनियम सिध्दार्थ गोवर्धन यांनी तर तबला नागसेन खोब्रागडे यांनी साथ दिली. अती उत्तम असे कोरस छबिता मेश्राम सूरागिनि भसारकर , अनुराधा कुंभारे ,राखी गोवर्धन व मधुकर लोणारे यांनी दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुखदेव वासनिक अध्यक्ष, वासुदेव कोल्हटकर सदस्य, धारबाई मेश्राम, पुष्पा वासनिक, आदिषा भेले, ताराबाई खोब्रागडे, डांगे ताई यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post