चीनमधील कोरोनाच्या चक्क चुकीच्या बातम्या व्हायरल


दलाल करणार लुटमार


चिन:-
ना सरकारी कार्यालय ना बाजार बंद, सर्व काही ठीक आहे. चीनमधील कोरोना संदर्भात येत असलेल्या बातम्या खोट्या आणि अतिरंजीत असल्याचे चीनमध्ये रहात असलेले भारतीय डॉ. अचल श्रीखंडे यांनी सांगितले. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याबद्दल संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात तर चीनमधील दवाखान्यांचे फोटो दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. कोरोना येणार म्हणून ठराविक दलाल लुटण्यासाठी तयार झाले आहेत. कोरोनाच्या काळात काही वैद्यकीय व्यवसायीकांनी मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेची लूट केली.


चीनच्या संदर्भात येत असलेल्या बातम्यांमुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा आपण दोन वर्षापुर्वीच्या स्थितीकडे जातो की काय? अशी चर्चा होत आहे. पण चीनमधील उभे केलेले चित्र वास्तवाला धरून नाही. चीनमध्ये काहीच काळजीची परिस्थिती नसल्याचे डॉ. अचल श्रीखंडे यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना सांगितले. डॉ. श्रीखंडे हे चीनमधील शांघाय येथे आहेत. ते म्हणतात कोविड हा आपल्या असुन तो संपूर्णपणे नष्ट होणार नाही. कोविड आता संसर्गजन्य रोग बनला असून तो सगळ्यांना होईल. सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असलातरी काळजीचे कारण नाही. ते म्हणाले की, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला हे खरं आहे परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कोठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत, आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहेत. लोक खुश आहेत, त्यांना सततची सक्ती होत होती ती दूर झाली आहे. जगभरात दाखविण्यात येते तशी परिस्थिती चीनमध्ये नाही. चीनमध्ये पसरणारा व्हेरीएंट हा अॅमीक्रॉन आहे . तो वेगाने पसरत असला तरी अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.

लोक रस्त्यावर मोकळेपणाने फिरतात, मजा घेतात

जगभरात दाखविली जाते तशी परिस्थिती चीनमध्ये अजिबात नाही. चीनमधील क्वारंटाईन सेंटर बंद करण्यात आलेली आहेत. ज्यांना लक्षणे आहेत त्यांना ७ दिवसासाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यावर मोकळे फिरत आहेत. मॉल्समध्ये जात आहेत, आनंद घेत आहेत. कशाही प्रकारची चिंता नाही.

भारतीयांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही

डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले चीनमधला व्हेरीएंट अॅमीक्रॉन आहे, त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरिएंटमधून भारतीय नागरीक गेले आहेत, त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. कोविडमुळे मृत्युचे थैमान सुरू असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांना काळजी करण्याचे कारण नाही.

ना सरकारी कार्यालय, ना बाजार बंद

आम्ही सगळे डॉक्टर्स यासाठी तयार होतो, रुग्णालय तयार होतील हा नॉर्मल क्यू आहे. रुग्णाला | व्हेंटीलेटर्सची गरज पडत नाही त्यामुळे आम्ही याला अतिशय नॉर्मली ट्रीट करत आहोत. एक-दोन दिवसात रुग्ण घरी परत जातो आहे. बहुसंख्य रुग्ण तर रुग्णालयात येतच नाहीत. त्यांना कम्पल्सरी ७ दिवस घरी थांबायचे आहे, कुठेही काहीही बंद करण्यात आलेले नाही. ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालय ना बाजार, सर्व काही चालू आहे असे डॉ. श्रीखंडे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post