आला रे आला तीन लाईटचा विज बिल 11550 रुपये आला


चिमूर(दि.24डिसेंबर):-एखाद्या गर्भ श्रीमंत व्यक्तीला महिन्याला हजार ते लाख रुपये पर्यंत विद्युत बिल येऊ शकतो आणि तो विद्युत भरणा करू शकतो, त्यांना तेवढा बिल येण्याचे कारण त्यांच्याकडे सर्व इलेक्ट्रॉनिक (फ्रिज, एसी, टीव्ही कुलर, मिक्सर, फॅन व इतर) गोष्टी असतात व ते त्या गोष्टींचा वापर करत असतात. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाला महिन्याचे हजार रुपये विद्युत बिल आले तरी त्याला भरणे कधी कधी शक्य होत नाही कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन सीमित असते.

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथील पत्रू सहारे यांना एका महिन्याचा बिल चक्क ११,५५० (अकरा हजार पाचशे पन्नास ) रुपये बिल आल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. संबंधित कुटुंब हे शेतकरी असून त्यांच्या घरी कुठलेही इलेक्ट्रॉनिक साधन नाही आणि थंडीचे दिवस असल्याने रात्रीला पंख्याचा वापर पण होत नाही, फक्त घरी असलेल्या तीन लाईटचा बिल चक्क अकरा हजार पाचशे पन्नास (११,५५०) रुपये आल्याने या कुटुंबाला महावितरण विभागाने चांगला शॉक दिला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पत्रू सहारे हे दर महिन्याला वेळेत विज भरना करत आहेत परंतु मागील काही महिन्यापासून त्यांच्या विद्युत मीटर मध्ये बिघाड असून नवीन विद्युत मीटर साठी शाखा अभियंता नेरी यांच्याकडे त्यांनी तक्रार अर्ज सुद्धा नेला होता परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही, त्यांच्या मीटरची चुकीच्या पद्धतीने रीडिंग होत असून मागील कित्येक महिन्यापासून ते वापरापेक्षा जास्त बिल भरत असणार यात तीळ मात्र शंका नाही.. त्यांना आलेल्या बिल हा गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला असून आता महावितरण विभाग काय करणार याकडे सहारे कुटुंबासह गावकऱ्यांचे सुद्धा लक्ष केंद्रीत झाले आहे

Post a Comment

Previous Post Next Post