जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्षाला दिले जीवदान*


   गूनेश काटगाये प्रतिनीधी 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशरी येथील चिमुकल्यांनी जपला माणुसकीचा धर्म

जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथील विद्यार्थ्यांनी जखमी पक्षाला पाणी पाजून जीवदान दिले. दिनांक 19 डिसेंबर 2022 ला सकाळी शाळा सुरू झाल्याबरोबर शालेय आवारामध्ये एक जखमी पक्षी फडफडताना दिसला. लगेच काही विद्यार्थी वंश काडगाये, हर्षद कापगते, यश खोब्रागडे, जीविका बोरकर, जीविका शहारे यांनी मुख्याध्यापक पी एन जगझापे यांच्याकडे जखमी पक्षाविषयी माहिती सांगितली. मुख्याध्यापक जगझापे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून बोलावून घेतले. वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक जायभाय व त्यांचे सहकारी यांनी हा पान कावळा असून शालेय आवारात कसा आला हे कळू शकले नाही असे सांगितले. हा पाण्यात राहणारा पक्षी असून याचे अन्न मासे आहे असे सांगितले. तद्वतच सर्व विद्यार्थी, शिक्षक व वन विभागाचे कर्मचारी 
यांनी त्या जखमी पक्षाला पकडून तलाव परिसरात सोडून दिले.
 सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आपुलकीने विचारपूस केली व सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post