भाऊ! एखाद्या मुलीला 'छम्मक-छल्लो, आयटम म्हणालात तर तीन वर्षा खाशील जेलची हवा


दिल्ली : तरुणींची छेडछाड, त्यांची सुरक्षितता हा नेहमीच गंभीर विषय असतो. हिंदू धर्मात महिलांना देवीचा दर्जा दिला आहे. महिलांची आदर करणं हा सर्व भारतीयांचा धर्म, कर्तव्य आहे. पण आजकाल काही तरुण याला आपला धर्म मानत नाही. मुलींची अथवा महिलांची छेड काढण्यात ते धन्य असतात. ते अनेकदा महिलांशी बोलताना अपशब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे महिलांना आपमानकारक वागणूक मिळाल्याचं जाणवतं. अनेकदा काही मुली, महिला याबाबत आवाज उठवतात, तर काही महिला लाजेखातर गप्प राहतात.. महिलांना, मुलींना अश्लिल कमेंट करणं, काहींसाठी फॅशन झालं आहे. सोशल मीडियावर याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पण अशा लोकांविरोधात पोलीस आणि प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. महिलांची छेड काढल्याचं प्रकरण पोलिसात आल्यानंतर पोलीस त्यांची चांगलीच खातरजमाई करतात. न्यायव्यवस्थेतही अशा लोकांविरोधात कठोर कायदे आहेत. तरीही काही लोक सुधारत नाहीत. मुलींची छेड काढणाऱ्या अशाच रोडरोमियोविरोधात आयपीसी अंतर्गत कठोर शिक्षेची तरदूत करण्यात आलेली आहे. पाहूयात त्याबबद्दल...


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरो (National Crime Investigation Bureau) ने नुकतेच महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमिओसंदर्भात ट्वीट केलेय. त्यामध्ये त्यांनी या रोडरोमिओंना एकप्रकारे इशाराच दिलाय. NCIB ने ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘ जर कुणी व्यक्ती एखाद्या महिलेला, मुलीला आवारा, छम्मक-छल्लो, आयटम, चुडैल, कलमुखी, चरित्रहीन यासारख्या शब्दांचा वापर करून बोलत असेल, अथवा अश्लील इशारे करत असेल. ज्यामुळे त्या महिलेला आपमानित झाल्यासारखं वाटत असेल तर आयपीसी 509 अंतर्गत त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा आर्थिक दंड होऊ शकतो... काही प्रकरणात छेड काढणाऱ्याला तुरुंगवास आणि आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो.’.



पाहा NCIB ने नेमकं काय केले होतं ट्वीट -







NCIB ने 16 डिसेंबर रोजी केलेल्या या ट्वीटला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिलाय. या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केलेय. तर यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडला. अनेकांनी नेटकऱ्यांनी ट्वीट करत याची प्रशांसा केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटलेय की, ‘3 वर्षाने काय होणार... मुलीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी.’, अन्य एका नेटकऱ्याने म्हटलेय की, ‘ हे शब्द कॉमन आहेत. सर्वसामान्यपणे हे शब्द उच्चारे जातात. पण शब्द उच्चाराताना त्या व्यक्तीचा हेतू नेमका काय असतो, हा मुळात प्रश्न आहे. महिलांचा अपमान करायचा म्हणून अशा शब्दांचा वापर होत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’


दरम्यान, NCIB च्या या ट्वीटला काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रश्न विचारला आहे. जर महिलांनी एखाद्या पुरुषाला अश्लील शब्दात अथवा अपमानकारक शब्दात बोलले तर काय करायचं.. अनेकदा महिला पुरुषांना कुत्ता, नीच, लतखोर, बेवडा, नशेडी, छपरी यासारख्या शब्दांचा वापर करुन हिनवत असतात. अशावेळी कोणत्या शिक्षेची तरदूत करण्यात आलेली आहे, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. पुरुषांचा अपमान करणाऱ्या महिलांनाही शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी काही युजर्सनी केली आहे.

Published at: 19 Dec 2022 09:59 PM (IST)

Post a Comment

Previous Post Next Post