कोजबीत दुहेरी, तर सुकाळात तिरंगी लढत

ग्रामपंचायत निवडणूक : वातावरण तापले


आरमोरी :- तालुक्यातील कोजबी व सुकाळा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबरला होऊ घातली असून, 2 दिवसांवर निवडणूक असल्याने प्रचाराची रंगत वाढली आहे. घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे.

कोजबी ग्रामपंचायतमध्ये दुहेरी लढत असून, सुकाळ्यातील तीन गटांत निवडणूक लढवल्या जात असल्याने सुकाड्यात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सुकाळा ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने सुकाळ्याच्या सरपंचपदासाठी पाच उमेदवारांनी नामनिर्देशन  केले आहे.

सरपंचपदासाठी सात उमेदवार... रिंगणात

 सुकाळाच्या सरपंचपदासाठी अविनाश कन्नाके, बंडू कुमरे, नंदकिशोर कन्नाके, दुर्योधन पेंदाम, विजय मडावी आदी उमेदवार रिंगणात आहेत. कोजबी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी निशा गेडाम, सविता ताडाम हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.


खोटे आश्वासन, विविध आमिष देऊन ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या उमेवारांना निवडून देऊं नये अन्यथा तुमचा विकास होणार नाहि. तसेच मतदारांनी पैसे घेऊन मतदान केले तर निवडून आलेला उमेदवार भविष्यात भ्रष्टाचार करणार  कारण ग्रामपंचायत मध्ये आता थेट निधी मोठया प्रमाणात शासनाकडून देण्यात येत आहे.त्यामुळे मतदाराने जागृत राहून आपल्या मतांचा योग्य वापर करून योग्यच उमेदवाराची निवड करावी.
या निवडणुकीत नवीन उमेदवारांना प्राधान्य द्यावे कारण जून्या उमेदवारांना प्राधान्य दिला तर त्याचे कामे आपण बघितलेच आहे त्यामुळे नवीन उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांचा अनुभव गावाच्या विकासासाठी एकदा घेउन बघावा. जो गावाचा सर्वागीण विकास करेल अश्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. निवडणुकीत   पैसे घेणे देणे कायद्याने आहे. त्यामुळे असे प्रकार निवडणुकीत होत असतील तर नागरिकांनी सतर्क राहून मोबाइलने शुटींग करून मतदार सबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करु शकतात तो मतदाराचा अधिकार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून   मतदारांनी मतदान करून योग्य उमेदवाराची निवड करावी.

Post a Comment

Previous Post Next Post