विद्यार्थिनीचा खून करून मृतदेहावर बलात्कार, शरीराचे तुकडे करून खाल्ले, तरीही शिक्षा का नाही?


आपल्या विद्यार्थीनीचा खून करून तिच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या आणि मृतदेहाचे तुकडे करत ते अनेक दिवस खाणाऱ्या एका नराधमाचा २४ नोव्हेंबरला वयाच्या ७३ व्या वर्षी निमोनिया होऊन मृत्यू झाला. विशेष म्हणजे १९८१ मध्ये केलेल्या या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षाच झाली नाही. तो अखेरपर्यंत तुरुंगाबाहेर मुक्त होता. आता त्याच्या मृत्यूनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचं नाव आहे इस्सेई सगावा. या पार्श्वभूमीवर इस्सेई सगावा कोण होता? त्याने आपल्याच विद्यार्थीनीचा खून का केला? खून केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या आणि शरीराचे तुकडे करून खाणाऱ्या या नराधमाला शिक्षा का झाली नाही? अशा अनेक प्रश्नांचा हा आढावा…

मूळचा जपानचा इस्सेई सगावा १९८१ मध्ये पॅरिसमध्ये शिकत होता. एक दिवस त्याने एका डच विद्यार्थिनीला कवितेचा अनुवाद करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावलं. जेवण केल्यानंतर इस्सेई सगावाने रेनी हार्टवेल्ड या डच विद्यार्थीनीच्या मानेवर गोळी झाडून तिचा खून केला. यानंतर त्याने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला. इतकंच नाही, तर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करत अनेक दिवस ते खाल्ले. इस्सेईने खालेल्या शरीराच्या भागांमध्ये हात आणि पायाचा समावेश होता.

मृतदेह पार्कमध्ये फेकताना अटक
काही दिवसांनी इस्सेई सगावाने मृतदेहाचे उरलेले तुकडे ‘बुआ द बुलोनिया’ या पार्कमध्ये टाकले. इस्सेई सगावा मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरून पार्कमध्ये गेल्यावर काही लोकांनी सुटकेसमधून रक्त गळत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी इस्सेई सगावाला अटक केली आणि मृतदेहाचे उर्वरित भागही हस्तगत केले.

मानसिक रुग्ण असल्याचं सांगत तुरुंगातून सुटका
१९८३ मध्ये फ्रेंच मानसोपचार तज्ज्ञांनी इस्सेई सगावाचं मानसिक असंतुलन बिघडलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला मानसोपचार केंद्रात ठेवण्यात आलं आणि १९८४ मध्ये त्याला त्याचा मूळ देश जपानमध्ये पाठवण्यात आलं. यानंतर पीडित डच विद्यार्थीनी रेनी हार्टवेल्डच्या कुटुंबाने पत्रकार परिषद घेत आरोपी इस्सेई सगावाविरोधात खटला चालवण्याची आणि गुन्हेगाराला मोकळे सोडू नये, अशी मागणी केली.

जपानचा गंभीर मानसिक आजार नसल्याचा अहवाल
जपानच्या प्रशासनाने इस्सेई सगावा परतल्यानंतर त्याच्या प्रकरणाचे कागदपत्रं देण्याची फ्रेंच प्रशासनाकडे मागणी केली. मात्र, फ्रेंच प्रशासनाने हा खटला संपला असल्याचं सांगत जपानला कागदपत्रे पुरवली नाहीत. त्यानंतर इस्सेई सगावाची जपानमध्ये पुन्हा वैद्यकीय तपासणी झाली. त्यात तो समजुतदार असल्याचं आणि त्याला केवळ ‘कॅरेक्टर अॅनोमली’ची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं. यासाठी त्याला रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही असं म्हणत त्याला सोडून देण्यात आलं.

Post a Comment

Previous Post Next Post