काम ३०लाखाचे आणि कमीशन ४७ लाखाचे इतके नालायक नगरसेवक...


जळगाव :- शहरातील काव्यरत्नावली चौक ते वाघनगर रस्ता नुतनीकरण साठी चार वेळा मंजुरी केली.२०१४मधे तर फक्त ४००मीटर रस्ता ९७ लाखांचे काम मक्तेदार एल एच पाटील यांना दिले होते. काम ३०लाखाचे आणि कमीशन ४७लाखाचे .इतके नालायक नगरसेवक आणि आयुक्त येथे होते.अजूनही आहेत. कामापेक्षा तीनपट रक्कम दिल्याने त्यावर शिवराम पाटील यांनी आक्षेप घेतला.उपोषण केले.अपहार उघडकीस येऊन जेलमध्ये जाण्याच्या भीतीने आयुक्त कापडणीस यांनी तो मक्ता रद्द केला होता.

व्हिडियो 


आता सुद्धा काव्यरत्नावली चौक ते वाघनगर पर्यंत हा रस्ता कोणातरी मक्तेदाराला दिला आहे.किती लांबी,किती उंची ,किती खडी,किती कपची,किती डांबर ही माहिती लपवलेली आहे.या कामात टेक्निकल एक्झिबिशन बोर्ड सुद्धा लावले नाही.जेणेकरून नागरिकांना अंधारात ठेवून रस्ता बनवला जात आहे.आमचा आक्षेप आहे.हा रस्ता दोन्ही कडे १० फूट सोडून चुकीचे काम करीत आहेत.रस्ता दोन्ही कडे गटार पर्यंत बनवला पाहिजे,अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती.म्हणून ही जनजागृती करण्यात आली.आमदार आणि महापौर यांना कामात लक्ष घालण्याबद्दल आवाहन करण्यात आले.काही वेळाने सा.बां.खात्याचे अभियंता श्री सुर्यवंशी यांनी येथे येऊन याबाबत जनतेला आश्वासन दिले कि,हा रस्ता पूर्ण गटारी पर्यंत करू.टेक्नीकल एक्झीबिशन बोर्ड लावू.
जळगाव जिल्ह्यातील, शहरातील आमदार आणि नगरसेवक भ्रष्टाचार करीत आहेत.भ्रष्टाचार होत असतांनाच आम्ही नागरिक चोरांच्या नरडीत हात घालतो.भ्रष्टाचार झाल्यानंतर तक्रार, पोलिस केस, कोर्ट करूनही चोरांना शिक्षा होत नाही.म्हणून चोरी करतांनाच चोरांना अडवले पाहिजे.असे आमचे धोरण आहे.

व्हिडियो 


  आमदार सुरेश भोळेंना,महापौरांना नागरिकांसमोर ताकिद दिली कि,जर यात भ्रष्टाचार झाला तर तुम्हाला सुद्धा सुरेश जैन सारखे जेलमध्ये जावे लागेल.यातून आमदार, महापौर, नगरसेवक ,अभियंता यांनी कोणीही मक्तेदाराकडून कमीशन खाऊ नये.आम्ही नागरिक जागृत झालो आहोत.जर कोणी मागितले तर मक्तेदाराने आमच्या कडे तक्रार करावी.आम्ही कमीशनखोरांच्या तोंडांत खडी आणि हातात बेडी घालू.



   जळगाव शहर भ्रष्टाचाराने बरबाद झाले आहे.रस्ते उखडून मोहेंजोदडो झाले आहे..हे आमदाराला,महापौरांना,नगरसेवकांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही.आता कमीशन मागणे बंद करा.प्रामाणिकपणे कामे करा.जनता जागृत झाली आहे.
    स्थानिक नागरिक राहूल चौधरी, सुरेंद्र पाटील,माजी नगरसेविका भोळे सोबत अजय पाटील, ईश्वर मोरे, राकेश वाघ व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते.


... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post