शाई फेकणाऱ्या 'त्या' समता सैनिकाला एक लाखांचे बक्षीस - राजरत्न आंबेडकर यांची घोषणा



लाखांदूर (भंडारा) : सूर्य प्रकाशमय असून, कोणीही सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केला, तर तोंडावर परत येते. ती थुंकी काळ्या शाईच्या रूपात चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर पडली. शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकाचे आम्ही समर्थन करीत असून, त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देणार असल्याचे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी घोषित केले.


बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्यावतीने लाखांदूर येथे सोमवारी आयोजित धम्म संमेलनात ते बोलत होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, वास्तविक पाहता ते काम आम्हालाच करायचे होते; मात्र ती संधी मिळाली नाही. ही संधी त्या समता सैनिक दलाच्या सैनिकाला मिळताच त्याने संधीचे सोने केले. मी आंबेडकर कुटुंबीयांच्यावतीने त्याचा आभारी आहे. असे ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post