दहावीच्या विद्यार्थांना मोठा दिलासा; फक्त बारावीलाच असणार बोर्ड..*

📖 नवीन शैक्षणिक धोरण आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असून, पदवी चार वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे; तर बारावीस्तरावर बोर्ड परीक्षा होणार आहे.

📖 २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्पा पहिली ते पाचवीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असणार आहे. पूर्वी तो पहिली ते चौथीचा होता. त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये ६ वी ते ८ वी या ३ वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो ५ वी ते ७ वी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिककडून ८ वी काढून ती प्राथमिकला दहावीऐवजी आता बारावी बोर्ड होणार जोडण्यात आली आहे.

🏫 *उच्च माध्यमिक कायमचे बंद*
नव्या धोरणानुसार, पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी, प्राथमिकचा दुसरा टप्पा सहावी ते आठवी, त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे टप्पे असतील. तर बारावी आता पदवीला जोडली असून, त्यामुळे आता उच्च माध्यमिकचा टप्पा नसेल.

📝 शेवटच्या वर्षी अकरावी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य होते. मात्र, बारावीला बोर्डाची परीक्षा जाहीर केल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होतील. या निर्णयाचा फटका माध्यमिक शाळांना बसण्याची शक्यता आहे.

🎓 सध्याचे शैक्षणिक धोरण 1986 पासून राबवण्यात येत होते. आता त्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-23) बदल होणार आहेत. शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे उभी केली जाणार आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण अशा दोन्ही पातळींचा अवलंब यामध्ये आहे. भारतात जवळपास २ कोटी मुले शाळाबाह्य आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असून ५+३+३+ ४ असे शैक्षणिक टप्पे असणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post