निरासक्त आणि निर्भय माणूस प्रामाणिक असतो

निरासक्त आणि निर्भय माणूस प्रामाणिक असतो.


     आपल्याला जे जे चुकीचं वाटते,तेथे विरोध केला पाहिजे.आज चुकीचे आहे आणि उद्या विरोध करू असे म्हटले तर रात्रभर मन मारून जगावे लागते.किमान रात्रभर मी अप्रामाणिक असतो.हे सहन केले तर मी असेच सहन करू शकतो.
मी प्रामाणिक माणूस आहे .माझ्याकडे सत्ता मिळाली तर मी प्रामाणिकपणे काम करीन.असे म्हणणारा माणूस उद्या प्रामाणिक राहात नाही.आजही प्रामाणिक नसतो.कारण प्रामाणिकपणा गहाण ठेवता येत नाही किंवा उसनवार घेता येत नाही.तो गुण आहे.जो कधीच लपवता येत नाही.लपत नाही.त्यात खंड पडत नाही.म्हणून जो माणूस आजच प्रमाणिकपणे काम करतो तोच उद्या प्रामाणिक असण्याची अपेक्षा करता येईल.
ज्या उमेदवाराने निवडणुकीत पैसे देऊन मत विकत घेतले किंवा तसा विचार ही मनात आणला तरी तो प्रामाणिक राहू शकत नाही.काही माणसे प्रामाणिक वाटतात.तसे वर्तन करतात.कदाचित भीतीपोटी.पकडला जाण्याच्या ,शिक्षेच्या भयाने चोरी न करणे म्हणजे प्रामाणिकपणा नसतो.चोरीची पुर्ण संधी असूनही ,पकडले जाण्याची भीती नसतांनाही चोरी न करणे ,हेच खरे प्रामाणिकपणाचे लक्षण आहे.
      मताचे पैसे वाटणे ही घटना महत्वाची नाही तर ती प्रवृत्ती महत्वाची आहे.ती प्रवृत्ती त्या माणसाला कायम चिकटलेली असते.
   मी स्वतः मुख्यमंत्री शिंदेंना जाऊन सांगितले कि गुलाबराव पाटील या माणसाला मंत्री बनवू नका.कारण त्यांनी कोरोनाकाळातील निधीचा अपहार केला आहे.तेंव्हा शिंदे म्हणाले कि,असा कोणीही आमदार माझ्या टिम मधे नाही ज्याने भ्रष्टाचार केला नाही.याचा अर्थ असा होतो कि शिंदे मानसिक दृष्टीने तयार आहेत, भ्रष्टाचार करायचा आहे.सर्वच मंत्री भ्रष्टाचार करण्याच्या मानसिकतेत आहेत.दे आर मेंटली प्रिपेअर्ड फॉर करप्शन.दे सीक अपॉर्च्युनिटी.पॉवर इज द मदर ऑफ अपॉर्च्युनिटी.ती एका आमदाराला देऊ नये,असे माझे म्हणणे होते,आहे.संधी आहे,भीती नाही म्हणून मंत्री भ्रष्टाचार करतात.हेच खरे कारण आहे भ्रष्टाचाराचे. आपण फक्त चोरांचा पाठलाग करतो.चोर चोरी करून घराबाहेर पडेपर्यंत आपण झोपेत असतो आणि तो दूरवर निघून गेला तेंव्हा पाठलाग करतो.यात आपले अपयश सामावलेले आहे.म्हणून चोर माल उचलून पळत नाही तोवरच त्याला पकडले पाहिजे.त्यासाठी आपण जागृत पाहिजे.आपण निर्भय पाहिजे.तरच शक्य आहे.
   मंत्री भ्रष्टाचार कसा करतो,हे आपल्याला ज्ञान पाहिजे.तरच आपण त्याला ओळखू शकतो.दुसरे त्याला पकडणे किंवा शस्त्र मारून फेकणे आवश्यक असते.नको! आपल्याला उद्या या मंत्री शी काही काम निघाले तर तो आपली अडवणुक करू शकतो.आपले काम बिघडवू शकतो.असा विचार मनात बाळगणारा माणूस मंत्री ला विरोध करू शकत नाही.म्हणून माझे धोरण आहे ,माझा कोणाकडे अर्ज नको.माझ्यावर कोणाचे कर्ज नको.असा माणूस जगला.खूप मोठा झाला.बैरिष्टर होता , महात्मा झाला.बैरिष्टर मोहनदास करमचंद गांधी होते.महात्मा गांधी झाले.तोच मार्ग आण्णा हजारे यांनी अनुसरला.मला तोच मार्ग आवडतो.त्यासाठी मला माझ्या गरजा मर्यादीत करणे आवश्यक आहे.श्रीमंत होण्याची हाव सोडली पाहिजे.जे जे सहज प्राप्त आहे त्यावर जगता आले पाहिजे.
     मंत्री भ्रष्टाचार करतो.आपण पोलिसात जातो.तक्रार करतो.कोर्टात जातो.खटला दाखल करतो.पण पोलिस आणि न्यायाधीश हेच सरकारी नोकर आहेत. मंत्री सरकार चालवतात.तर पोलिस व न्यायाधीश सरकारचे पेंड सर्व्हंट आहेत.मालकाच्या विरोधात नोकर जातील कसे?यासाठीच तर लोकपाल आणि लोकायुक्त ची गरज आहे.जेथे फक्त पोलिस किंवा फक्त न्यायाधीश असणार नाहीत.तेथे अधिकारी, समाजसेवक सुद्धा असतात.ते भिन्न मतांचा आधार घेऊन निर्णय घेतात.
     जो माणूस न्यायदान करतो तो सरकारच्या अधीन नोकर असू नये.म्हणून न्यायाधिशांना पगार दिला जाऊ नये.जी माणसे फुकट न्याय देण्याच्या मानसिकतेत असतील तेच खरा न्याय देऊ शकतात.
न्यायदानाचे तत्व आहे. नोकर हा मालकाच्या विरोधात न्याय देऊ शकत नाही.
कारण एकतर तो पगाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो.
दुसरे तो भीतीने ग्रस्त असतो.
पैसे ,पगार घेणारा माणूस न्याय देण्यास पात्र नसतो.
कारण मोबदला मिळतो म्हणून काम करणे ,यात सेवा बुद्धी,न्याय बुद्धी शिल्लक राहत नाही.
लिगल ऑर इल्लिगल ग्रेटीफिकशन इफेक्ट्स द कन्सर्न जस्टीस.
ऍक्शन आफ्टर द एक्स्पेक्टेशन माईंड इज नॉट फेअर.जस्टीस अल्सो.


... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post