बृहन्मुंबई मनपा तर्फे पहिल्यांदा सहभागी झालेल्या बँड पथकाचे कौतुक विशेष..पोलीस उप निरीक्षक - विनोद विचारे

दिलीप अहिनवे - मुंबई प्रतिनिधी
मुंबई, दि. १९ : मुंबई पोलीस शिक्षण विभागाच्या वतीने पूर्व उपनगराच्या आर. एस. पी. रॅलीचे आयोजन चेंबूर मधील आर. सी. एफ. मैदान येथे नुकतेच करण्यात आले होते. गावदेवी पोलीस ठाणे येथे ऐ. टी. सी. विभागात पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे विनोद विचारे यांनी सांगितले की, माझ्या ३० वर्षाच्या हयातीत प्रथमच मुंबई महापालिका बॅण्ड पथक या आर. एस. पी. रॅलीत सहभागी झाले आहे. मुलुंड 'टी' विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलाच्या बॅण्ड पथकाने प्रथमच या रॅलीत सहभागी होऊन एक नवा इतिहास घडवला. यापूर्वी कधीही मुंबई महापालिका शाळा बॅण्ड पथकात सहभागी झाली नव्हती. या रॅलीत एकूण ३७ प्लॅटुन व ७ बॅण्ड पथके सहभागी झाली होती. पैकी मुंबई महापालिकेचे ७ प्लॅटुन सहभागी झाले होते.


मुलुंड कॅम्प संकुलातील मुलुंड कॅम्प मनपा मराठी शाळा क्र. २ व मुलुंड कॅम्प मनपा इंग्रजी शाळेतील मुलांनी दमदार सादरीकरण केल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

मुलुंड 'टी' विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी ही संधी मुलांना उपलब्ध करुन दिली होती. सर्व विद्यार्थ्यांनी खुप मेहनत घेतली. त्यामुळे एवढा बहूमान मिळू शकला.


मुलुंड 'टी' विभागाचे भूतपूर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा) नंदु घारे, विद्यमान प्रशासकीय अधिकारी (शाळा) कैलाशचंद्र आर्य, भूतपूर्व विभाग निरीक्षक गोरखनाथ भवारी व विद्यमान विभाग निरिक्षिका कांचन गोसावी यांनी नेहमीच बॅण्डचे सादरीकरण बघुन मुलांना प्रोत्साहित केले होते.

मुलुंड कॅम्प मनपा इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका रेऊ साबळे व मुलुंड कॅम्प मनपा मराठी शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक मनोज पवार यांनी उत्तम सहकार्य केले. बॅण्ड प्रशिक्षक राजेश शिंदे, राजेश अवघडे, अनिल पाटील व मीना महाडिक यांचे उत्तम सहकार्य लाभले.


मुलुंड कॅम्प संकुलातील शारीरिक शिक्षण शिक्षक दिलीप अहिनवे व यशवंत चव्हाण यांनी मुलांचा कसून सराव करुन घेतला. शाळेतील शिक्षकांचे उत्तम सहकार्य नेहमीच मिळत होते म्हणून हा इतिहास घडु शकला.

मनपा उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) किर्तीवर्धन किरतकुडवे, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी व कनिष्ठ पर्यवेक्षक धैर्यधर पाटील व मधुकर माळी यांनी उत्तम सादरीकरण केल्याबद्दल मुलांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post