मतदार सुधारले तरच वाघनगर सुधारेल


वाघनगर मधील रहिवासी कामाला महत्व देत नाहीत.त्यांना मतांचे पैसे दिले कि ते दाऊद इब्राहिम ला ही मतदान करतील.काम, मतदान, निवडणूक, ग्रामपंचायत हे समीकरण वाघनगर मधील रहिवाशांना आवडत नाही.पैसा,दारू, मतदान, निवडणूक, ग्रामपंचायत , पुन्हा पैसा हे समीकरण आवडते.
वाघनगर साठी आम्ही लढून चार लाख रूपये गटार बांधकाम साठी आणले.ग्रामपंचायत खात्यात पडले.पैकी फक्त एक लाख नव्वद हजारांची गटार नगरसेवक नगरसेविका व ग्रामपंचायत सदस्याच्या घरापर्यंत बांधली.पुढे बांधलीच नाही.पुढे जनावरे राहातं असतील का? कदाचित सरपंच आणि ग्रामसेवक तसे समजत असतील.दोन लाख दहा हजार पडून आहेत.आणि गटार रस्त्यावर वाहाते.मी ग्रामसभेत याबाबत आक्षेप घेतला तर भ्रष्टाचारी सदस्यांनी उत्तर तर दिलेच नाही उलट एक महिला माझे अंगावर घालून विनयभंग, बलात्कार प्रकरण रंगवले जात होते.पोलिस आडवे आले म्हणून ती महिला माझ्याशी झोंबाझोंबी करू शकली नाही.भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी हे दुसरे पाप करणारे वाघनगर चा विकास करतील,असे अजूनतरी येथील रहिवाशांना वाटते.ग्रामसभेतील एकाही माणसाने किंवा महिलेने याबाबत प्रश्न केला नाही कि, शिवराम पाटील सांगतात ते खरे कि खोटे?पैसे आहेत तर काम का करीत नाहीत? 
यावरून असा निष्कर्ष निघतो कि,वाघनगर मधील रस्ता बनवण्याची गरज नाही,गटार बांधण्याची गरज नाही.फक्त मंडपात जेवण आणि दारूचे पैसे वाटण्याची गरज आहे.
येथील ग्रामपंचायत सदस्याने स्वताच्या अंगणात सिमेंट चा रस्ता बनवून घेतला.दोन बेकायदेशीर स्पीड ब्रेकर टाकले.वाहनांना ते ठोकले जातात.मी आक्षेप घेतला तर एकही माणूस किंवा महिला बोलले नाहीत.सर्वच दाबलेले,दबलेले,मेलेले असतील का? ग्रामसभा आटोपली.नंतर काही माणसे मला येऊन सांगत होती कि आमची ही गाडी यामुळे खराब झाली.यावरून असा निष्कर्ष निघतो कि,येथील रहिवासी गुलाम सारखे जगतात.जेवण,दारू पुरतेच त्यांच्या मतांची किंमत आहे.जेथे मताची किंमत मोजून घेतली जाते,येथे विकास करण्याची गरज नसते,असे सरपंच, ग्रामसेवक, महापौर, आयुक्त, कलेक्टर, आमदार, मंत्री , मुख्यमंत्री यांचा अभ्यास असतो. ही मंडळी अशा लोकांना ओळखून विकास करायचा कि नाही,तसे ठरवतात.
    वाघनगर मधे ग्रामसभा घेण्यासाठी आम्ही आंदोलन केले.आंदोलनात दहा बाया माणसे आली.ग्रामसभा झाली.तेंव्हा पन्नास बाया माणसे आलीत.पण जेवणाचा मंडप टाकला तेंव्हा दोन हजार बाया माणसे आलीत.म्हणजे विचारांची ,हक्काची,कामाची लढाई नको पण जेवणाला आणि दारूला मात्र गर्दी करतात ‌.असे वास्तव चित्र वाघनगरचे आहे.अशी मानसिकता वाघनगर च्या रहिवाशांची आहे.कारण वाघनगर मधे अधिकतम नोकरी करणारे लोक राहातात.जे नोकरीच्या ठिकाणी लाच लुचपत, चिरीमिरी घेऊन काम करतात.त्यांची मानसिकता नागरिकांच्या खिशात हात घालण्याची किंवा तोंड वेंगाळण्याची बनते.घर,कार,स्कूटर,मोटर असली तरी ते तसेच वागतात.जसे भुरटे चोर वागतात.ते उघड माथ्याने,उघड्या तोंडाने बोलू शकत नाहीत.चोरीची माय मडक्यात तोंड लपवते.ही म्हण येथे तंतोतंत अनुभवास येते.जो नोकर लांच घेत नाही.जो नोकर चोरी करीत नाही.जो नोकर भ्रष्टाचार करीत नाही.जो साहेबाचे नोकर उष्टे खात नाही.तोच नोकर ताठ मानेने बोलतो.हाड खाणारा कुत्रा भुंकतो. गुरगुर करतो..गु खाणारा कुत्रा भुंकत नाही.शेपटी हलवत लपतो.हा स्वभाव धर्म आहे.तो माणसाला सुद्धा तंतोतंत लागू पडतो.
     मी क्लास वन अधिकारी होतो.मी क्लास टू अधिकारी होतो.जिल्हा माझ्या ताब्यात होता.तालुका ताब्यात होता.कलेक्टर आमच्या ओळखीचे आहेत.एसपी आमच्या नात्यातील आहेत.माझा मुलगा फॉरेन ला आहे.अशी बढाई मारणारे मात्र येथे शेपटी मागे घालून मान खाली घालून असतात.
     येथे पैसे घेऊन मत विकणाऱ्यांची संख्या जास्त आहे.काम पाहून,माणूस पाहून मत देणाऱ्यांची संख्या कमी आहे.असा ग्रामपंचायत चा अनुभव आहे.काका, पांच वर्षे आम्ही तुमच्या सोबत राहू.पण निवडणुकीत दहा दिवस मजा तर मारू द्या.असे सांगणारे तरूण येथे आहेत.तुम्ही पण थोढेफार पैसे वाटा, फुकट मत नाही मिळणार,असे सांगणारे मतदार येथे आहेत.तोपर्यंत वाघनगर मधे विकास होणार नाही.जो पर्यंत हे चूक ,हे बरोबर असे म्हणण्याचे धाडस करणारे वाढत नाहीत तोपर्यंत हे वाघनगर असेच राहाणार आहे.
    वाघनगर मधील रस्ते कच्चे असले तरी बरे होते.किमान पायी चालता येत होते.रिक्षावाला येत होता.आता रिक्षावाला येत नाही.कारण काही विकृत लोकांनी आपल्या अंगणात फुकटचे मिळाले म्हणून दगड,खोटे,माती ,मुरूम टाकून घेतला.अंगण उंचनिच केले.धड पायी चालता येत नाही.अंगणातील दगड,खड्डे पाहून त्यांच्या मेंदूतील खड्डे मोजता येतात.काही लोकांनी तर अंगणात दहा फुटांचे कुंपण करून घेतले.काही लोकांनी आपल्या जातीचे धर्माचे झेंडे घरावर लावून घेतले.ही कोणती मानसिकता आहे?हे बदलणे आवश्यक आहे.तरच वाघ नगरचा विकास होऊ शकतो.
      वाघनगर मधील गटार बांधकामाचा पैसा ग्रामपंचायत मधे पडून आहे.आणि येथील लोक वर्गणी जमा करून गटार बांधत आहेत.पण एकाची ही हिंमत नाही,जो सरपंचाला,ग्रामसेवकांना रूबाबात सांगेल कि ,गटार बांधा.हक्कासाठी रूबाबदार बोलण्याचे धाडस वाघनगर मधील रहिवाशांमध्ये नाही.
    कालच दोन तरूण आमदाराच्या दारू दुकान जवळ होते.मला थांबवले.म्हणाले, आमच्या गट नंबर १७७,जेथे ग्रामपंचायत सदस्य राहातात,तेथे गटारी बांधण्यासाठी पैसे जमा करीत आहेत.काका काहीतरी करा.म्हटले काय करणार?ग्रामसभेत यासाठी सरकारी निधी पडून आहे.चार वर्षे झालीत.सरपंच , सदस्य व ग्रामसेवकांनी गटार बांधली पाहिजे.असे मी ठासून सांगितले.पण एकानेही माझे समर्थन केले नाही.आणि तुम्ही तर सदस्यांच्या शेजारी राहातात.तर त्यांना हा प्रश्न करा.गटार बांधायला सांगा.विनयभंग चा गुन्हा होणार नाही याची दक्षता घ्या.जी आफत माझ्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता.ग्रामसभेत उत्तर न देता आल्यामुळे महिला अंगावर घालून विनयभंगाचा आरोप करण्याचे पुर्वनियोजित होते.
   आधी माणूस माणसासारखा तयार झाला पाहिजे.माणूस विचार करायला शिकला पाहिजे.माणसाला हक्काची जाणीव पाहिजे.माणूस कष्टाचे ,न्यायाचे खाणारा पाहिजे.तरच तो चांगला विचार करू शकतो.चांगली माणसे ओळखू शकतो.तरच चांगली माणसाला मतदान करू शकतो.तरच ग्रामपंचायत सुधारू शकते.तरच कामे होऊ शकतात.
     बघा नीट.अभ्यास करा. विचारांच्या आणि विकासाच्या या प्रवासात तुम्ही कुठपर्यंत पोहचले आहात? फुकटची दारू ,जेवण,पैसा यातून वाघनगर मुक्त झाले तर आपण विकास करू शकतो.


...... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post