भरधाव दुचाकी गोठ्यात घुसली, चालक ठार


घोट : नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वांना नवीन वर्षाचे वेध लागलेले असताना एका दुचाकीचालकाला स्वतःच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला. भरधाव वेगात हा दुचाकीचालक रस्त्यालगतच्या गोठ्यात शिरला आणि बैलाला बांधण्याच्या खुंट्यावर मृत्यू झाला. कपाळमोक्ष होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास नेताजीनगर येथे घडली.

व्हिडियो 
👇👇👇👇👇



शंकर पांडुरंग वडेंगवार (४८ वर्ष) रा. वालसरा असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तो आपल्या एमएच ३३. एल ६३७६ या क्रमांकाच्या मोटारसायकलने वालसरा येथून घोटजवळ असलेल्या वरूर येथे जात होता. नेताजीनगर येथे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो सुनीता सरकार यांच्या बैलाच्या गोठ्यामध्ये घुसला. यावेळी बैलांना बांधण्यासाठी लावलेला लाकडी खुंटा त्याच्या कपाळाला लागल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच ठार झाले.


वडेंगवार हे हेल्मेट घालून मोटारसायकल चालवत नव्हते. त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असते तर कदाचित त्यांना गंभीर इजा झाली नसती आणि त्यांचे प्राण वाचू शकले. असते, याबाबतचा घोट पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी संदीप रोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुरारी गेडाम करीत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post