"हम कूच भी करेंगे साब! लेकीन दारू जरुर सप्लाय करेंगे" असे पोलीसांना आवाहन करणारे सापडले

आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथील पोलिसांनी दारू तस्करी करणारी स्कॉर्पीओ मुद्देमालासह पकडली.

प्राप्त माहितीनुसार २९ डिसेंबरला गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर कडून आष्टी कडे येत असलेल्या स्कार्पीओ क्र MH 31 DC 6816 ह्या गाडीने दारु तस्करी होत आहे असे कळले. त्यावरून आष्टी चेक पोस्ट येथे सापळा लावण्यात आला व ते वाहण जाळ्यात सापडले. वाहणाची चौकशी केली असता ९० मीली चे संत्रा कंपनीचे १ लाख ६० हजार रुपयांची देशी दारू मिळून आली. गाडीची किंमत ५ लाख रुपये असा एकूण सहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहनात दोन इसम मिळाले प्रमोद महादेव दुर्योधन (३७), मुकुंद गंगाराम चालुरकर (५४) असे आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ज्ञानेश्वर सराफ, नापोशी अविनाश कारशेट्टीवार, पोशी अतुल तोडासे, कुंडलीक चौधरी यांनी केली. आरोपी विरुद्ध कलम ६५ (इ),८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी यांना न्यायालयापुढे हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. तिसऱ्या आरोपी चा शोध आष्टी पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post