हे असले लाचखोर अधिकारी गावच्या वेशीत उघडे करून चांगले ठोकलेच पाहिजे .....

लाचखोर उपजिल्हाधिकारी घुगे यांच्या घराची झाडाझडती

बुलढाणा, : भुसंपादन प्रकरणात एका गरीब शेतकर्‍याला मोबदला देण्यासाठी एक लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले गेले. अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने लगेच लाचखोर उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्या घराची झाडाझडती घेतल्यावर मोठी मालमत्ता सापडली आहे.

शेती, प्लॉट आणि फ्लॅटच्या खरेदीची कागदपत्रे भरलेली बॅग आणि 3 लाख 4 हजार रुपये नगदी, असा दस्तावेज़ एसीबीने जप्त केला आहे.

कारवाई नसल्याची जी खरेदी खते मिळाली आहेत, त्यात औरंगाबाद आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांमध्ये घुगे यांनी पत्नीच्या नावावर 16 प्लॉट घेतलेले आहेत. तसेच औरंगाबाद शहरात त्यांचा फ्लॅट आहे तर परभणीच्या जिंतूरमध्ये त्यांची 15 एकर शेती असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. निश्चीतच (Sub Collector) घुगे यांची ही संपत्ती बेहिशोबी असल्याचे कळते. लाचखोर उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देवी घेव- मारे, व बुलडाण्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस निरीक्षक महेश भोसले, पोहेकॉ विलास साखरे, नितीन टवलाकर नाईक पोलीस शिपाई जगदिश पवार, विनोद लोखंडे, प्रवीन बैरागी, शेख अरशिद यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post