ब्रम्हपुरी येथील त्या' युवतीच्या आत्महत्येस जबाबदार आरोपी फरारच



पाच दिवसांपासून पोलिस घेताहेत शोध

 ब्रह्मपुरी :- निर्माणाधीन न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला गळफास घेतलेल्या युवतीचा मृतदेह ६ डिसेंबरला आढळून आला होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येथील न्यायालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेला सचिन शेंडे (३२) रा. कोंढाळा, ता. देसाईगंज हाच मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने ३०६ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही सदर आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मिलिंद हरिदास लाडे (५८) रा. चोप, ता. देसाईगंज यांच्या मुलीचे लग्न
सचिन गोवर्धन शेंडे याच्याशी जुळले होते. १६ एप्रिल २०२१ ला लाडे यांच्या घरी साक्षगंध पार पडले. १९ ऑक्टोबर २०२१ ही लग्नाची तारीख ठरली. मात्र, कोरोनाकाळात वराचा मोठा भाऊ मरण पावला व कोरोना असल्याने लग्न पुढे करू, असे वराने सांगितले होते. दिवाळीनंतर वडिलांनी वारंवार लग्नाची विचारणा केली असता मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिली. लग्नास उशीर होत असल्याने वडिलांनी आपल्या नातेवाईकांसह मुलाचे कोंढाळा येथील घर गाठत लग्नाबाबत विचारणा केली असता मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे नाही. मी न्यायालयात आहे. तुम्हाला जे करायचे ते करा, असा दम त्याने दमही दिला होता, अशी माहिती आहे.


Post a Comment

Previous Post Next Post