लाखो आदिवासीं बांधव - जय सेवा . जय आदिवासीचे नारे देत नागपूर विधी मंडळावर धडकले -

गडचिरोली - गोंडवाना गणतंत्र पार्टी व आदिवासी संघर्ष कृती समिती चा महाआक्रोस मोर्चा यशवंत स्टेडियम नागपूर येथे जमा होत . लाखोच्या संख्येनी विधिमंडळावर धडकला . पिवळे झेंड ' पिवळ्या टोप्या ' पिवळ्या दुपट्यांनी यशवंत स्टेडियम चा परिसर पिवळाधम्मकदिसत होता . जय सेवा - जय आदिवासी चे नारे देत पारंपारिक गोंडी रेला ' नूत्य सहीत .आदिवासीचा मोर्चा विधिमंडळावर धडकला . - खऱ्या आदिवासीवर होत असलेला अन्याय शिंदे - फडणवीस सरकार करीत असुन बोगस आदिवासीना सरक्षण देत आहे . . 




त्यामुळे लाखो सुशिक्षीत बेरोजगारांनावर अन्याय होत आहे . १४ डिसेंबर २०22 चा अधिसंख चा जि . आर . मागे .घ्यावा . पंतप्रधान घरकुल योजना ' रमाई घरकूल योजना ला दिली जाणारी तुटपुंजे मानधानात वाढ करावी आदी ४० मागण्याचे निवेदन महाराष्ट्र शासनाला देण्यात आले . आदिवासींच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचा ईशाराही आदिवासी बांधवांनी शासनाला दिला . - सदर मोर्च्यात ५० चे वर आदिवासी संघटनेने सहभाग घेतला होता . यात गोडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तुलेश्वरजी मरकाम ' राजे वासुदेवशहा टेकाम ' राष्ट्रीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे ' गोंगपाचे के सी पाडवी ' माजी मंत्री वसंत पुरके ' . माजी आमदार डॉ . नामदेव उसेंडी . मधुकर उईके ' ऑल इंडिया एम्प लाईज फेडरेशनचे अध्यक्ष राम चव्हाण . लक्की जाधव ' दशरथ मडावी ' प्रमोद घोडाम ' विविध आदिवासी सामाजीक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मोर्च्यात मार्गदर्शन केले . यात माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार प्रत्यक्ष मोच्चेकरुची भेट घेवून मार्गदर्शन केले . मोर्च्यात विदर्भातून लाखों आदिवासी बांधव उपस्थित होते ..

Post a Comment

Previous Post Next Post