जगाच्या पाठीवर आर्थिक क्षेत्रात प्रचंड ज्ञान मिळवणारा ज्ञानचक्षु म्हणजे डाॕ.बाबासाहेब आंबेडकर : प्रा. संजय मगर




देसाईगंज

               जगाच्या पाठीवर आर्थिक क्षेत्रात प्रचंड ज्ञान मिळवणारा ज्ञानचक्षु म्हणजे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर होत. ज्या देशाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात जगाच्या नविन तत्वज्ञानाची मांडणी करणारा प्लेटो, राजन बेकन शिकविल्या जात नसेल तर त्या देशात विर, मुसद्दी, तत्वज्ञानी निर्माण होणार नाही. बहुजनातील मागची पीढी खुप हुशार असल्याने सरकारी नोकरीचा लाभ मिळाला असे नसून महापुरुषांचा संघर्ष व संविधानाने दिलेली संधी व अधिकारामुळे हे शक्य झाले. आजची पिढी ही मागच्या पीढी पेक्षाही अधिक हुशार असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उतरण्याबरोबरच प्रसंगी बंड करण्याची तयारीही ठेवावी असे आवाहन प्रा.संजय मगर यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ  महाविद्यालय देसाईगंज येथे आयोजित  ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने  ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले. 
              कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव निलकंठ  पोपटे  होते.अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना पोपटे  म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्माण करायला शिकले पाहिजे कारण प्रश्न न विचारणारी पीढी जेव्हा तयार होते तेव्हा तो देश अधोगतीला जातो.
                   विद्यालयाचे प्राचार्य  एस.एम. धोंगडे  यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या फोटोला हार अर्पण केल्यानंतर श्रध्दांजली वाहण्यात आली. इयत्ता ११ व १२ कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. जेष्ठ शिक्षक  रामदास जिभकाटे ,  हेमंत लाडे  व इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिक्षिका सायली यांनी तर कु. प्रतीक्षा सहारे या विद्यार्थीनीने सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post