डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन मोठया उत्साहात साजरा




एटापली मादगी समाज तालुका संघटनेच्या वतीने कार्यक्रम 

एटापली :-  मादगी समाज संघटनेच्या वतीने जिवनगट्टा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश मादगी समाज संघटना कार्याध्यक्ष शेखरभाऊ पु्ल्लीवार यांच्या आदेशाने जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वासेकर व देवलमरी ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आलं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन  विजय चोपादंडीवार प्रमुख अतिथी म्हणुन आलापल्लीचे प्रतिष्ठित नागरिक निलेश रामगिरीवार  विजय चिपाकुर्तीवार, प्रकाश नक्कालवार,चंदु चोपादंडीवार, गणपत चोपादंडीवार, शामराव अंतरवार, अशोक चोपादंडीवार, बापू कंबलवार, किशोर कुकुडकर, पुष्पा कंबलवार,मिराबाई जन्नेवार,निलाबाई जन्नेवार,रेखा चोपादंडीवार पार्वती चोपादंडीवार व एटापल्ली तालुक्यातील समाज बांधव बहू संख्याने उपास्थिती होते या वेळी मान्यावरांनी भारतीय राज्य घटनेच्या शिल्पाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्राला सुरूवात केले या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेशजी रामगिरीवार यांनी बाबासाहेबांनी देशासाठी व मागासलेल्या समाजासाठी केलेल्या कामाची माहीती दिलेत व समाजातील सरकारी कर्मचारी समाजाच्या उन्नतीसाठी सहायता करावी असे म्हणाले,या वेळी मादगी समाज संघटना एटापल्ली तालुका अध्यक्ष विजय चिपाकुर्तीवार, उपाध्यक्ष चंदु चोपादंडीवार, सचिव प्रकाश नक्कालवार,यांनी मनोगत वक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका मादगी समाज संघटना पदाधिकारी व समाजातील बांधवानी मदत केले.

Post a Comment

Previous Post Next Post