केशोरी येथे भव्य रात्र कालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन


गुणेश काटगाये प्रतिनीधी

शिवमुद्रा क्रीडा मंडळ कनेरी केशोरी यांच्या वतीने भव्य रात्र कालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी या कबड्डी स्पर्धेमध्ये जवळपास 50 ते 60 चमूनी सहभाग घेतला त्या अनुषंगाने बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या बक्षीस वितरणाचे पाहुणे म्हणून या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतजी घाट बांदे नंदकुमार जी पाटील गहाणे सरपंच केशरी योगेश भाऊजी नाकाडे तालुका युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विजय साळवे युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा विलास भाऊ बोरकर सामाजिक कार्यकर्ते रामटेके मेजर पोलीस स्टेशन संजय परशुराम कर वनरक्षक पटले जी वनरक्षक सय्यद मेजर हे उपस्थित होते या अंतिम सामन्याचे परीक्षक म्हणून तितरमारे मेजर गोटेफोळे मेजर यांनी सामन्याला अंतिम रूप देऊन परीक्षकाची भूमिका निभावली त्याच बरोबर प्रथम पारितोषिक विजेते एरंडी द्वितीय पारितोषिक विजेते गोठणगाव व तृतीय पारितोषिक विजेते धमदी टोला या तिन्ही टीमचे पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजू वलतरे यांनी केले


Post a Comment

Previous Post Next Post