तिन पायली दळणाच्या पैसाच्या कारणावरून महिलेला केले मारहाण


-ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करा अखील भारतीय मादगी समाज संघटनेची मागणी

मूल:चंद्रपूर तालुक्यातील गोंड सावरी या गावातील मादगी समाजाच्या महिलेवर तिन पायली दळणाच्या पैसाच्या कारणावरून सौ.लता अनिल चंदावार,या महिलेला 26 ऑक्टोबर रोजी त्याचं गावातील गुंडप्रवृत्ती असलेला शंकर लोनगाडगे,नामक व्यक्तींनी घरात बंद करून खाली पाडून जातिवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्यानी जबर मारहाण केली यात महिला गंभीर जखमी होऊन सुद्धा या घटनेची गंभीर दखल नघेता मूल पोलीस स्टेशनं अंतर्गत फक्त क्रॉस एन. सि. आर. दाखल करून मूल रुग्णालयातून पीडित महिलेला घरी पाठविण्यात आले व क्रॉस गुन्ह्याच्या आधारे पीडित महिलेच्या पातिवर प्रतिबंधक कारवाही करून त्याला अटक करून तहसीलदार यांचे कडून जमानत घेण्यास भाग पाडले, पण योग्य दोषीवर कुटलीही कारवाही नकरता दोषीला मोकाट सोडण्यात आले.
मात्र महिलेला गंभीर दुखापत असल्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे वैद्यकीय उपचारासाठी भरती करण्यात आले, वैध्यकीय तपासणीनंतर तिच्या छातीचे ऑपरेशन करून तब्बल एक महिना भरती राहावं लागलं ही घटना गंभीर स्वरूपाचे असल्याची माहिती अखिल भारतीय मादगी समाज संघटनेला माहिती होताच त्याप्रकरणी पोलीस स्टेशन मूल येथे प्रत्यक्षरीत्या जाऊन गंभीर घटनेच्या आधारवार योग्य चौकशी करून आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी आरोपीला तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निवेदनातून इशारा राष्ट्रीय अध्यक्ष मोहन देवतळे,यांचे मार्गदर्शनानुसार,मा.दिपकदादा बोलीवार प्रदेश अध्यक्ष तथा दलित पँथर यांच्या वतीने दिलेला आहे.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किशोर पगळपलीवार,प्रदेेश सचिव विशाल सांयकार,जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार,विजय देवतळे,गडचिरोली जिल्हाप्रभारी गडचिरोली, सचिव सतीश दुर्गमवार,मुुख्य कार्यवाहक धम्मराव तानादु,ऑल इंडिया पॅथर चे जिल्हाध्यक्ष निमसरकार सर, अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल कोडापे,गजु आलेवार,सुनील नल्लूलवार,चंदन बोईनवार,अनिल चंदावार,गंगाधर बोरकर,अनिल थिपे,राजू गावडे,संतोष दिवसे,मोरेश्वर लाटेलवार,संतोष झिलपल्लीवार, व पिडीत परीवार असे विविध सामाजिक संघठना,पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होतें.

Post a Comment

Previous Post Next Post