गुड्डीगुडम येथे धान गोडाऊन उपलब्ध करा

रमेश बामनकर /जिल्हा प्रतिनिधी 

🌐शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक त्रास थांबेल

गुड्डीगुडम :- अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात तिमरम, निमलगुडम, नंदिगांव, गुड्डीगुडम, गोलाकर्जी, झिमेला आदी गावे असून या परिसरात धान पिकाचे शेतकरी जास्त प्रमाणात आहेत. परंतु गुड्डीगुडम येथे धान गोडाऊन नसल्याने धान विक्री करिता २५ किमी अंतरावर असलेल्या कमलापूर गोडाऊन ला न्यावं लागते.कमलापूर धान विक्री करण्यास अनेक त्रास सहन करावा लागतो. एक किंवा दोन दिवस कमलापूर या ठिकाणी मुक्काम ठोकावं लागतो तेव्हा शेतकऱ्यांचे धान विक्री होतो यात शेतकऱ्यांना आर्थिक बुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे करिता गुड्डीगुडम येथे धान गोडाऊन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
  कमलापूर सोसायटी अंतर्गत अनेक गावाचं समावेश आहे यात कोरेपली, चिरेपली, राजाराम, दामरंचा, मांड्रा, छल्लेवाडा, गुड्डीगुडम, गोलाकर्जी, रेपणपली आदी गावांच समावेश असून शेतकऱ्यांना धान विक्री करताना जनु काही कसरतच करावी लागेल म्हणून राजाराम व गुड्डीगुडम येथे धान साठवणूक करिता गोडाऊन उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे.धान शेतकरी जास्त असल्यामुळे कमलापूर गोडाऊन ला धान विक्री जास्त होतो व साठवून ठेवण्यासाठी जागा ही अपुरा पडतो. आणि गोडाऊन बाहेर छल्ली लावून ठेवतो तेव्हा कुत्रे, डुकरे खराब करतात ही समस्या दूर करण्याकरिता रजाराम व गुड्डीगुडम येथे धान गोडाऊन मंजूर करून बांधकाम करून शेतकऱ्यांना सोयसुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गुड्डीगुडम येथील शेतकरी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post