लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवाचं लज्जास्पद कृत्य, ओरडतच नवरीने वरातीला हाकलवून लावलं


नवी दिल्ली, 20 डिसेंबर : लग्नाचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. लग्न ठरल्यापासून प्रत्येक प्रसंगात दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवून संयमानं वागण्याची अपेक्षा असते.
कधीकधी एखादी चूकही महागात पडते आणि ठरलेलं लग्न मोडू शकतं. बिहारमध्ये अशाच एका घटनेत चक्क वधूनं वराला वरातीतून माघारी फिरण्यास सांगितलं. नवऱ्या मुलाच्या एका चुकीमुळे नवरीनं लग्नच मोडलं. 'झी राजस्थान'नं त्याबाबत वृत्त दिलं आहे.

बिहारमधल्या सौरभ कुमार याचं लग्न ठरलं होतं. वैदपूर ग्रामपंचायतीतल्या मझगायच्या प्रकाश मंडल यांचा मुलगा असलेल्या सौरभची वरात बिहारच्या बांका परिसरात आली होती. बांका समुखिया मोड गावातल्या जनक मंडल यांची मुलगी नीलमशी त्याचं लग्न होणार होतं. मात्र एका घटनेनं ठरलेलं लग्न मोडलं.

वधूच्या घरी वराकडच्या मंडळींचं जोरदार स्वागत झालं. एकीकडे ज्येष्ठ महिला गाणी म्हणत होत्या, तर दुसरीकडे डीजे सुरु होता. घराला सुंदर सजावट केली होती. कुटुंबियांसोबत नवरीही नवरदेवाला पाहण्यासाठी आतुर झाली होती.

नवरदेव घोड्यावर बसून वरातीतून येत होता. लग्नामुळे सगळे खूश होते मात्र अचानक एक भलता प्रसंग घडला. त्यामुळे नवरीनं लग्नालाच नकार दिला.
वरातीतून मिरवत येत असलेला नवरदेव विचित्र प्रकारे वरातीत नाचायला लागला. सगळ्या नातेवाईकांमध्ये घुसून तो विचित्रपणे नाचत होता.

स्वतःचं लग्न असल्याचा त्याला विसर पडला आणि इतरांना नाचताना पाहून तो चक्क उड्या मारून नाचायला लागला. त्याचवेळी तिथे नवरी आल्यामुळे तो सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यावर नाराज होत तिनं वरातीला माघारी फिरण्यास सांगितलं. नवरीच्या निर्णयामुळे घरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

कुटुंबियांपासून पंचायतीपर्यंत सगळेच लग्न मोडू नये यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र नवरी तिच्या निर्णयावर ठाम होती. नवऱ्या मुलाची मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे त्याच्याशी लग्न करू शकत नाही, असं तिचं म्हणणं होतं. गावातल्या लोकांनी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला, तर पंचायतीनंही तिला पाठिंबा दिला.

त्यामुळे नवरदेवाच्या कुटुंबियांना लग्न न होताच माघारी जावं लागलं. लग्न पाहावं करून असं आपल्याकडे म्हटलं जातं. हा आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग असतो. त्यामुळे त्या संदर्भातले सगळे निर्णय संयमानं घेण्याची आवश्यकता असते.

कोणत्याही एका प्रसंगात स्वतःचा तोल ढळला, तर लग्न मोडण्यापर्यंत परिस्थिती निर्माण होऊ शकते. तशीच परिस्थिती बिहारमधल्या लग्नात झाली. नवरदेवाचा स्वतःवरचा ताबा ढळल्यामुळे नवरीनं लग्नच मोडलं. दोन्ही कुटुंबियांवर नामुष्की ओढवली.

Post a Comment

Previous Post Next Post